
Sambhajinagar : पैठणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोटच्या मुलाने स्वतःच्या वडिलांची हत्या केली. धक्कादायक म्हणजे हा निर्दयी तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने वडिलांची हत्या करून त्यांचा मृतदेह जमिनीत गाढला. आठवडा उलटून गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत व्यक्तीचे नाव कल्याण बाबुराव काळे असून त्यांच्या मुलाचे नाव रामेश्वर कल्याण काळे असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील कडेठाण येथे राहणाऱ्या कल्याण काळे आणि त्यांचा मुलगा रामेश्वर काळे यांचा शुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादातून संतापलेल्या रामेश्वरने जन्मदात्याची हत्या केली. मात्र हत्या केल्यानंतर ते कोणालाही समजू नये म्हणून निर्दयी रामेश्वरने वडिलांचा मृतदेह घरातच जमिनीत पुरला.
|
|
हत्येनंतर आठवडा उलटून गेल्यानंतर रामेश्वरच्या घरात दुर्गंधी सुटली. शेजाऱ्यापाजाऱ्यांना या दुर्गंधीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवले असता पोलिसांनी काळे यांच्या घराची झडती घेतली. या तपासानंतर रामेश्वरने केलेला गुन्हा उघडकीस आला. याबाबत पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पैठण महसूल व वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खड्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. याप्रकरणात पोलिसांनी मृत कल्याण यांच्या मुलाला त्यांच्या हत्येसाठी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!


























Subscribe to my channel




