
Maharashtra Flood : राज्यात पावसाने हाहाकार केला असून अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूर येऊन शेतीसह घरांचे नुकसान झाले. त्याचसोबत शेतकऱ्यांची जनावरं देखील दगावली आहेत. यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. सध्या सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाऊलं उचलत आहे. मंत्र्यांसह नेते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत. 'सरकार शेतकऱ्यांसोबत असून त्यांना तातडीने मदत केली जाईल. पुढच्या दोन दिवसांत सरकार शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेईल.', अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दौरे केले. शेतकऱ्यांचे संकट खूप मोठं आहे. शेतकरी बोलताना त्याच्या वेदना जाणवत होत्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये असा पाऊस पडला नाही. संकट मोठं आहे. अशा स्थितीत सरकार खंबीरपणे मागे उभे राहिली. शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे राहिले आहे. त्यामुळे आजही कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. संकट मोठं आहे त्यामुळे मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. जवळपास ६० लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. पुढील २ दिवसांत संपूर्ण नुकसानीचे आकडे येतील.
पुढच्या २ दिवसांत सरकार शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेईल अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, 'शेतकऱ्यांना मदत करताना अटी, नियम बाजूला ठेवून मागे उभे राहिले पाहिजे. अतिवृष्टी, संकट येत तेव्हा मदत करणारे आमचे सरकार आहे. फडणवीस, अजित पवार आणि मी दोन दिवसांत शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ. याआधीही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले आहे. आता आलेल्या संकटात पिकाचे नुकसान झाले. जमीन वाहून गेली आहे. पशूधनाचे मोठं नुकसान झालंय. घरे पडली आहेत. जिवितहानी झाली आहे. पाऊस थांबलाय पण नदीच्या प्रवाहामुळे काही घरे पाण्याखाली आहेत. त्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.'
तसंच, 'अशा परिस्थितीमध्ये आम्ही केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिघांच्या सहीचे पत्र मोदींना पाठवले आहे. केंद्र सरकार, मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनेक योजना केंद्र अन् राज्याने केल्या आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील, याची ग्वाही देतो. शेतकऱ्यांना मदत करणं सर्वांचं आपलं कर्तव्य आहे. सरकार मदत करणार आणि शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार. सर्वांनी शेतकऱ्यांसाठी जी मदत करता येईल ती करावी. शेतकऱ्यांना तात्काळ जीवनआवश्यक वस्तू देण्याची गरज आहे. त्यासाठी गहू, तांदूळ अन् १० हजार देण्याची सुरूवात झाली आहे. सत्ताधारी, विरोधक यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. मुलांची पुस्तके, वह्या वाहून गेली आहेत. आम्ही गेल्या आठवड्यापासून मदत पाठवण्याचे सुरूवात केली. त्या भागात लोक शेतकऱ्यांना मदत पोहचवत आहेत. शेवटच्या शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत मदत सुरू राहणार आहे.', असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



