
Pimpri : शहरात रोजगारासाठी आलेल्या बुलडाणा येथील दाम्पत्याच्या मुलाचे चिंचवड येथून अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच खंडणीविरोधी पथकाने दोन तासांत त्याची सुटका केली. त्यांच्याच गावातील ओळखीच्या व्यक्तीने मुलाचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. मात्र, अपहरणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गजानन सुपडा पानपाटील (वय २५, रा. पुनई, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुलाच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा येथील दाम्पत्य काही दिवसांपूर्वी आठ वर्षांच्या मुलासह पिंपरी-चिंचवड शहरात कामासाठी आले होते. गजानन हा अपहृत मुलाच्या वडिलांच्या भावाचा मित्र आहे. गजानन हादेखील शहरात कामाच्या शोधात आला होता.
मात्र, त्याला काम मिळाले नाही. मुलाचे आई-वडील हे दोघेही कामाला जातात. मुलगा घरीच राहत होता. त्या वेळी गजानन त्याच्याशी जवळीक साधत असे. मुलाला खाऊ देत असे. यापूर्वी एकदा त्याने मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलाच्या आईने मुलाला त्याच्या तावडीतून सोडविले होते. ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपीने मुलाचे अपहरण केले.
|
|
मुलाच्या आईने मंगळवारी (१ एप्रिल) चिंचवड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. अपहरणाची माहिती कळताच खंडणीविरोधी पथकाने तपासाला सुरुवात केली. पथकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचे छायाचित्र आणि मोबाइल नंबर प्राप्त केला. तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी अपहृत मुलाला रेल्वेने घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार भुसावळ पोलीस ठाणे, रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस, भुसावळ रेल्वे स्थानक, मुक्ताईनगर, जळगाव, चाळीसगाव पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. ‘सीसीटीव्ही’च्या फुटेजवरून रेल्वे पोलिसांनी आरोपीची शहानिशा करून काशी एक्सप्रेसमध्ये बसलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन अपहृत मुलाची सुटका केली. खंडणीविरोधी पथकाचे फौजदार सुनील बदाने, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, ज्ञानेश्वर कुराडे यांनी चाळीसगाव पोलीस ठाणे येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. फिर्यादी महिलेचे दुसरे लग्न झाले आहे. अपहृत मुलगा तिच्या पहिल्या पतीपासूनचा मुलगा आहे. तो आई आणि सावत्र वडिलांबरोबर राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलाचे अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी झाले, हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. – देवेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणीविरोधी पथक
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




