
Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तसेच विविध अभियांत्रिकी कामासाठी मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक असेल. यावेळी लोकल सेवा नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. या कालावधीत काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द आणि काही पूर्णत: रद्द होतील, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील. तर, ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सुटणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान नियोजित थांब्यांनुसार थांबतील.
|
|
हार्बर मार्ग
कुठे : कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून पनवेल येथे जाणाऱ्या लोकल आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल/वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. हार्बरवरील प्रवाशांना ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांवरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची मुभा आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. यावेळी काही लोकल रद्द करण्यात येतील. तसेच चर्चगेटकडे येणाऱ्या काही लोकल वांद्रे, दादरपर्यंत चालवण्यात येतील आणि तिथूनच डाऊन मार्गाकडे वळतील.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel




