
Kolkata : कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर लैगिंक अत्याचार झाला होता. अत्याचारानंतर डॉक्टरची हत्यादेखील करण्यात आली. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती. १८ जानेवारीला या अत्याचार-हत्या प्रकरणाची सुनावणी होती. सुनावणीत कोर्टाने या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले. आरोपीला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.
पश्चिम बंगालच्या सियालदह कोर्टाने शनिवार (१८ जानेवारी) कोलकाता डॉक्टर अत्याचार-हत्या प्रकरणाचा निकाल सुनावला. आरोपीच्या विरोधात बीएनएस कलम ६४, ६६, १०३/ १ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कोर्टाने सांगितले. आरोपी आरजी कर मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे सेमिनार रुममध्ये महिला डॉक्टर आराम करत होती. आरोपीने डॉक्टरवर हल्ला करुन लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली.
|
|
मागच्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. कोलकाता पोलिसांनी आरोपी संजय रॉयवर ९ ऑगस्ट २०२४ रोजी डॉक्टरवर अत्याचार करुन हत्या करण्याचा आरोप केला होता. १० ऑगस्ट रोजी पोलिसांनी रॉयला अटक केली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवले होते. या प्रकरणी १२ नोव्हेंबरपासून सुनावणी सुरु झाली होती. ५७ दिवसांनंतर सियालदह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी या गंभीर प्रकरणावर निकाल दिला. कोर्टाच्या निकालावर आरोपीने 'मला खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. मी काही केलं नाही. ज्यांनी हे कृत्य केलं, त्यांना मोकळं सोडलं आहे. यात एक आयपीएस अधिकाऱ्याचाही सहभाग आहे' असे म्हटले आहे.
पीडित डॉक्टरच्या पालकांनी या प्रकरणात आणखी लोक सामील असल्याचा दावा केला आहे. गुन्हात इतर लोक सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अन्य आरोपींनाही अटक करुन न्यायालयात खटला सुरु केला जाईल अशी त्यांना आशा आहे. या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

