Baramati :बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री; बिनविरोध शक्यता संपली

Baramati :बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राजकीय रंगत वाढणार आहे.

काँग्रेसकडून बारामती आणि राहुरी मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. बारामतीमधून 6 जणांनी, तर राहुरीमधून 4 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व इच्छुकांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली नाही तर काँग्रेस दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्यास पूर्णपणे तयार आहे.” तसेच उमेदवारांची अंतिम घोषणा एक-दोन दिवसांत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उमेदवार जाहीर करण्यापूर्वी काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करणार असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार की काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

30 मार्च 2026 रोजी बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

 
 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *