
Mumbai : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमान अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. अपवादात्मक ठिकाणे वगळता कमाल तापमानही ३४ अंश सेल्सिअसच्या आत आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण- मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून राज्यात थंड वारे येत आहेत. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. मध्यरात्री आणि पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. किमान तापमान राज्यात अनेक ठिकाणी २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. तर कमाल तापमान अपवादात्मक ठिकाणे वगळता ३४ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. मागील दोन दिवसांपासून नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात १८ अंश सेल्सिअसपर्यंत पारा आला आहे. मंगळवारी (२९ ऑक्टोबर) महाबळेश्वर येथे १५.४ अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि हवेतील बाष्प आणि पहाटे कमी होणाऱ्या तापमानामुळे राजाच्या बहुतेक भागात दाट धुके पडत आहे. अनेक ठिकाणी सकाळी आठ वाजेपर्यंत धुके पहावयास मिळत आहे. पुढील काही दिवस धुके कायम राहण्याचा अंदाज आहे.
हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात उत्तर भारतातून काही प्रमाणात थंड वारे येत आहेत. तर, ईशान्य वारे राज्यावर येताना बंगालच्या उपसागरातून बाष्प सोबत आणत आहेत. या दोन्ही वाऱ्यांचा मिलाफ दक्षिण महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन – चार दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण – मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पहाटे गारवा जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज आहे. दिवाळीनंतरच थंडीला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
शहर
- पुणे: मराठी कलाविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन!
- मुंबई: शिवाजी पार्कचे झाले ‘जंतर-मंतर’, ठाकरे बंधू रस्त्यावर उतरले; आदित्य ठाकरेंचा ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा, अमित ठाकरेही सहभागी!
- पुणे: संतापजनक प्रकार चालत्या रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह थेट रस्त्यावर कोसळला बेघर रुग्ण; सुरक्षेचा फज्जा उडाल्याने खळबळ!
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे विजयाचे खाते उघडले, ‘ब’ गटातून संग्राम सोर्टे विजयी!
- पुणे: मराठी कलाविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी निधन!
- मुंबई: शिवाजी पार्कचे झाले ‘जंतर-मंतर’, ठाकरे बंधू रस्त्यावर उतरले; आदित्य ठाकरेंचा ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा, अमित ठाकरेही सहभागी!
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
























Subscribe to my channel



