
Mohol Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु आहे. मात्र, अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असतानाच काही ठिकाणी मोठ्या घडामोडी घडत असून उमेदवार बदलले जात आहेत. यामध्ये काँग्रेसने कोल्हापूरमध्ये उमेदवार बदलला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) मोहोळ मतदारसंघात उमेदवार बदलला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सिद्धी रमेश कदम ((Siddhi Kadam)) यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करत त्यांच्या ऐवजी मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मोहोळ (Mohol Constituency) तालुक्यातील काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सिद्धी कदम यांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मोहोळमध्ये उमेदवार बदलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगितली जात आहे.
|
Pune : गटारावर फटाके फोडताना स्फोट झाल्याने दोन मुले जखमी, सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागातील घटना |
मोहोळमध्ये कोणाला दिली उमेदवारी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या कन्या सिद्धी कदम यांना मोहोळमधून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सिद्धी कदम यांची उमेदवारी अचानक रद्द करत मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचानक उमेदवारी बदलण्यात आल्यामुळे मोहोळच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबरोबरच जयंत पाटील यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र देत सिद्धी रमेश कदम यांच्या नावे देण्यात आलेला पक्षाचा एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असं पत्र देण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द का केली?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून सिद्धी कदम यांना मोहोळमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महाविकास आगाडीच्याही काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. तसेच या पदाधिकाऱ्यांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी अर्ज रद्द करत त्यांच्या ऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




