
Pune : पुणे-बंगळुरू महामार्गावरील पश्चिम बाह्यवळण मार्ग वाहतुक कोंडीमुक्त करण्यासाठी विविध कामांना केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी हिरवा कंदील दर्शवला असून, तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव व उपाययोजना सादर करण्याच्या सूचना पुणे वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलिस आयुक्त अमितेशकुमार व अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट मिलिंद रोडे आदी सहकाऱ्यांसमवेत आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला आहे.
पुणे शहर हे लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील नवव्या क्रमांकाचे शहर आहे. पुणे महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश झाल्यानंतर पुण्याचे क्षेत्रफळ ५१९ चौरस किलोमीटर झाले. भौगोलिकदृष्ट्या पुणे देशातील सर्वांत मोठी महानालिका आहे. पुण्यात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. यातूनच निर्माण झालेली पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कोंडीची समस्या लक्षातघेऊन त्यासाठीची उपाययोजना करण्यात येत आहे.
|
Pune Crime : धक्कादायक! कुटुंबीयांकडे तक्रार केल्याचा राग, मित्रानेच मित्राचा काटा काढला |
प्रस्तावित उपाययोजना
- पुणे महापालिकेच्या माध्यमातून भूमकर अंडरपास शेजारी प्री-कास्ट बॉक्स पद्धतीचा जोड अंडरपास करणे.
- ननावरे अंडर पासजवळ 'किया शोरूम' आणि 'रिनॉल्ट शोरूम' येथे प्रत्येकी एक असे दोन अंडरपास तयार करणे.
- नवले ब्रिज येथे नङ्ग्राच्या दिशेने जाणाऱ्या वाहनासाठी
- का लेनवर कॉन्टिलिव्हर ब्रिज बांधून इतर सर्व लेनला चॅनेलाइज करून चौक सिग्नल फ्री करणे.
- पाषाण-सूस रोडवरून हायवेला जोडणारा जोडरस्ता व प्रलंबित सव्र्व्हिस रोड पूर्ण करणे.
- राधा हॉटेल येथील 'पीएमपीएमएल 'ची जागा व 'हॉटेल
- ऑर्किड 'समोरील जागेवर १०० मीटर मार्जिन रस्ता तयार करून रोटरी वाहतूक सुरू करणे. या ठिकाणी अंडरबायपास तयार करण्यासाठी व्यवहार्यता तपासणी करणे.
- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडपैकी २७.९९ किलोमीटर लांबीचे आणि १२ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड तयार करणे.
- पुणे महापालिकेकडून ४९.१२ किमी लांबीचा व १२ किमी रुंदीचा बाह्य सेवा रस्ता तयार करणे.
- पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर रस्त्याला बालेवाडी औध रस्ता सक्षम पर्याय असल्याने बालेवाडी स्टेडियमसमोर बालेवाडीकडून मुंबईला जोडण्यासाठी उड्डाणपूल उभारणे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपाययोजनांना तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी 'एनएचआय', पुणे महापालिका; तसेच पुणे पोलिसांना एकत्रित काम करण्यास सांगितले आहे. या उपाययोजनांनंतर या बासपासवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
गडकरींकडून सादरीकरणाचे कौतुक
पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पश्चिम बाह्यवळण मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत असून, वाहनचालकांच्या वेळेचा मोठा अपव्यय होत आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे सादरीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी केले. नितीन गडकरींनी या सादरीकरणाचे कौतुक करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलिसांना एकत्र बैठक घेण्यास सांगितले, त्यानुसार, दोन्ही यंत्रणांनी शनिवारी सायंकाळपर्यंत पश्चिम बाह्यवळण मार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यासाठी गडकरी यांनी ३०० कोटी रुपयांच्या खर्चाला तत्त्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
बॉटल नेकमुळे रस्त्यांची कोंडी
पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कात्रज-देहूरोड बाहावळण मार्गावर दररोज १० लाख वाहने ये-जा करीत असून, हा रस्ता चारपदरी झाला असला, तरी त्यावरील 'बॉटल नेक' मुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत १०० पेक्षा अधिक अपघात झाले असून, त्यात ६८ नागरिकांचे प्राण गेले आहेत. ५४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा बाह्यवळण मार्ग वाहतूक कोंडीतून सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रस्तावित विकासकामांविषयी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सादरीकरण केले. त्यात या मार्गावरील अपघात मालिकांचे विदारक चित्र उघड झाले. हा रस्ता सहापदरी करण्याचा निर्णय २०१०मध्ये झाला. मात्र, मागील १४ वर्षांपासून हे काम संथ गतीने सुरू आहे. या रस्त्यालगत अनेक ठिकाणी सेवा रस्ते पूर्ण झालेले नाहीत. वाहनचालकांच्या अपघातात भर पडत आहे. या रस्त्याच्या विकासकामाचा वनवास संपविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून, त्याकडे पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गडकरींचे लक्ष वेधले.
नागरीकरणाचा रेटा
गेल्या ३० वर्षांत नन्हे, धायरी, नांदेड सिटी, उत्तमनगर, भूगाव, पिरंगुट, सूस, बाणेर, म्हाळुंगे, हिंजवडी, आणि किवळे या भागांत साधारणतः १० लाखांपेक्षा जास्त नागरिक राहण्यास आले आहेत. या बायपासच्या पश्चिमेला मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, दक्षिणेकडे 'आयटी पार्क' विशेषतः हिंजवडीसह अनेक औद्योगिक व शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील गर्दी वाढली आहे.
शहर
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
महाराष्ट्र
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
- बीड: लेकींच्या शिक्षणासाठी आईचा अनवाणी एल्गार; साडी नेसून धावली अन् अंबाजोगाईत जिंकली मॅरेथॉन!
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!



























Subscribe to my channel


