पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:धन आणि आरोग्य, हे दोन्ही धन्वंतरींच्या कलशात आहेत

समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. तो दिवस धनत्रयोदशीचा होता. धन्वंतरींसोबत दोन गोष्टी जोडलेल्या आहेत-धन आणि आरोग्य. ते देवांचे वैद्य अन् विष्णूचे अवतार आहेत. धन्वंतरींची खरी संपत्ती कोणती? आणि ते कोणते आरोग्य प्रदान करतात? त्यांचे वैशिष्ट्य असे आहे की, ते जग चालवण्यासाठी संपत्ती देतात आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी स्वास्थ्यही देतात. आरोग्य आणि स्वास्थ्य, ही दोन्ही धन्वंतरींच्या कलशात आहेत. आरोग्य ही एक जीवनशैली आहे. याला इंग्रजीत ‘वेलनेस’ म्हणतात. ती सक्रिय सरावासारखी आहे. आणि स्वास्थ्य म्हणजेच ‘हेल्थ’ ही एक स्थिती आहे. याला आपण ‘रिॲक्टिव्ह रिझल्ट’ म्हणू शकतो. आपल्याला कितीही वयापर्यंत जगायचे असो, आपल्याला कोणतीही अस्वस्थता नसताना आपला शेवटचा श्वास घ्यायचा असेल, तर ते काम केवळ धन्वंतरीच आपल्यासाठी करू शकतात. म्हणूनच धनत्रयोदशीला आपण संकल्प करूया. आपण असे कोणतेही धन कमावणार नाही, ज्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होईल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *