
Pune : चैत्र वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी संस्थानची महत्त्वाची बैठक पार पडली असून आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. राज्यभरातील वारकरी आणि भाविक ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात, त्या पालखीचे यंदा ८ जुलै रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
दरम्यान, पालखीच्या पुण्यातील मुक्कामाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. पारंपरिकरित्या १८ दिवसांच्या या प्रवासात पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. मात्र, यंदा दिंडी समाजाच्या बैठकीत काही अडचणी मांडण्यात आल्या. गेल्या वर्षी भवानी पेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने अनेक दिंड्यांना पालखीपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. यामुळे मुक्कामाची जागा बदलण्याची मागणी पुढे आली.
या पार्श्वभूमीवर भवानी पेठेऐवजी वडकी नाला येथे मुक्काम ठेवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र, या निर्णयाला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकरी संप्रदायाकडून विरोध होत आहे.
भवानी पेठ व्यापारी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचवडे आणि केदारेश्वर विठ्ठल मंदिर (गणेश पेठ) येथील गोपी घोरपडे यांनी याबाबत पत्र देत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा भवानी पेठेतच पार पडतो आणि संपूर्ण पुणे शहर या दोन दिवसांत भक्तीमय वातावरणात रंगून जाते.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पालखी मुक्कामाच्या काळात सर्व समाजघटक—युवक, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था, मंडळे आणि सर्व धर्मीय नागरिक—भक्तिभावाने सेवा करतात. तसेच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या जवळ असल्याने भाविकांना दर्शन सोपे होते.
मुक्काम स्थलांतराच्या चर्चेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली असून “हा ऐतिहासिक व भावनिक सोहळा बदलू नये” अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे. गरज असल्यास सोहळ्याचा कालावधी वाढवावा, मात्र पुण्यातील पारंपरिक कार्यक्रमात बदल करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सध्या या मुद्द्यावर अंतिम निर्णय काय होणार, याकडे वारकरी आणि पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



