
Pimpari : चिंचवडमधील संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयावर नूतनीकरण, सुशोभीकरणाच्या नावाखाली २० कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता पुन्हा सुशोभीकरणासाठी २४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आठ वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद असलेल्या या संग्रहालयास आणखी वर्षभर टाळे असणार आहे. त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पशू-पक्ष्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये एमआयडीसीच्या सात एकर जागेमध्ये १९८९ मध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय उभारले. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे २०१६ ला सुरुवात झाली. तेव्हापासून संग्रहालयाला टाळे आहे. प्राणिसंग्रहालयासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे.
त्यानुसार सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. २० कोटी रुपये खर्च करून आणि आठ वर्षे काम करूनही प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले नसून, संग्रहालयाला टाळे आहे. या कामात गैरव्यवहार झाल्याचा आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ३६ प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
|
|
सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे (एफडीसीएम) हस्तांतरित करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महामंडळाने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार या प्राणिसंग्रहालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून ते पूर्ण करावे. पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, त्याप्रमाणे सेवा-सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेने जुनी निविदा रद्द केली. संग्रहालयासाठी एक तज्ज्ञ अधिकारी नियुक्त केला. तसेच सल्लागार बदलण्यात आला. आता आराखड्यात बदल व सुधारणा करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविली आहे.
२४ कोटींची निविदा
प्राणिसंग्रहालय सुशोभीकरणाच्या उर्वरित कामाची २४ कोटी दोन लाख १६ हजार ६८ रुपये खर्चाची निविदा स्थापत्य उद्यान विभागाने प्रसिद्ध केली आहे. या कामाची मुदत एक वर्ष आहे. २६ ऑगस्टला निविदा उघडल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या सूचनेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संग्रहालयाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत संग्रहालय बंदच राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संग्रहालय ‘एफडीसीएम’ यांच्याकडे द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय होईल. कदाचित महापालिकेकडेही कायम राहील, स्थापत्य उद्यान विभागाचे सह शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



