गोवा: विक्रोळी परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय उच्चशिक्षित विद्यार्थ्याचा गोव्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गोव्यातील 'इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च'मध्ये कायद्याचे (Law) शिक्षण घेणारा कुशाग्र पटाले (वय २१, रा. विक्रोळी, मुंबई) आणि त्याचा मित्र यश मलिक (वय २०, रा. रोहतक, हरियाणा) हे दोघे सोमवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टॅक्सीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विक्रोळीचा रहिवासी असलेला कुशाग्र पटाले आणि त्याचा वर्गमित्र यश मलिक हे दोघे शिक्षणाच्या निमित्ताने गोव्यात एकत्र राहत होते. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हे दोघे पर्वरी (Porvorim) येथून वास्कोच्या (Vasco) दिशेने दुचाकीने जात होते. कुशाग्र दुचाकी चालवत होता, तर यश त्याच्या मागे बसला होता. मांडवी नदीवरील नवीन पुलावर (New Mandovi Bridge) पोहोचले असता, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव टॅक्सीची आणि त्यांच्या दुचाकीची अत्यंत भीषण धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पार चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना बांबोळी येथील 'गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल' (GMC) येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दुसरीकडे, या अपघातात टॅक्सीच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले असले, तरी टॅक्सीतील पर्यटक जोडपे आणि चालक राजकुमार कट्टीमनी (रा. सांगोल्डा) हे सुदैवाने सुखरूप बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मांडवी पुलावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित नसल्यामुळे अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे घडला, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगोल्डा येथील टॅक्सी चालक राजकुमार कट्टीमनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील तरुण आणि होतकरू विद्यार्थ्याचा अशा प्रकारे अपघातात अंत झाल्याने विक्रोळी परिसरात आणि त्याच्या मित्रांमध्ये शोककळा पसरली आहे.
शहर
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
महाराष्ट्र
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- उल्हासनगर: लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेची मोठी घोषणा; ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजने'तून विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६ हजार रुपये!
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
गुन्हा
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला


























Subscribe to my channel



