नांदेड: "नमस्कार, मी शरद पवार बोलतोय..." अशी अत्यंत मोजक्या शब्दांत सुरुवात करून थेट विषयाकडे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका फोन कॉलने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे संपूर्ण चित्र आणि राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. या अचूक व गोड चक्रव्युहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचा ऐतिहासिक विजय झाला असून, याद्वारे या पक्षाचे मराठवाड्यातून विधान परिषदेमध्ये अधिकृत खाते उघडले गेले आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 'काका विरुद्ध पुतण्या' अशी मोठी फूट पडल्यानंतर, या पक्षाचे मराठवाड्यातील तत्कालीन दिग्गज सतीश चव्हाण आणि विक्रम वसंत काळे हे दोन्ही विधान परिषद सदस्य अजित पवार यांच्या गटासोबत निघून गेले होते. पक्षातील बहुतांश आमदारही तिकडेच दाखल झाले होते. त्यानंतर सव्वा वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला या विभागातून केवळ एकच जागा मिळाली होती, तर वरच्या सभागृहात त्यांचा एकही प्रतिनिधी उरला नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीत औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. सुरुवातीला पक्षाची कोणतीही मोठी पूर्वतयारी नसताना, पक्षातील काही नेत्यांनी प्रतापसिंह पाटील यांचे नाव सुचवले आणि पक्षश्रेष्ठींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. निवडणुकीपूर्वी धाराशिव व परभणी जिल्ह्याबाहेर त्यांची फारशी व्यापक ओळखही नव्हती.
निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचाच सगळीकडे बोलबाला आणि प्रभाव दिसत होता. त्यांच्या सलग चौथ्या विजयाचा दावाही मोठ्या दाव्याने केला जात होता. त्यांच्या भक्कम व प्रभावी यंत्रणेसमोर इतर सर्व उमेदवार सुरुवातीला अत्यंत मामुली वाटत होते. मात्र, प्रतापसिंह पाटील यांच्या विजयासाठी पडद्यामागे अनेक अदृश्य हात प्रभावीपणे कार्यरत होते, ज्याची कल्पना भल्याभल्या राजकीय धुरिणांना लागली नव्हती. आता निकाल जाहीर झाल्यानंतर यामागील खरी रणनीती समोर आली आहे.
मतदानाला काही दिवस बाकी असताना शरद पवारांनी अत्यंत गुप्तपणे आणि धोरणीपणे मराठवाड्यातील आपल्या जुन्या-विश्वासू सहकारी नेत्यांसह ठिकठिकाणच्या परिचित व अपरिचित शिक्षण संस्थाचालकांशी थेट दूरध्वनीवरून (फोन कॉल) संवाद साधला. प्रत्येकाशी ते मोजकेच पण अगदी नेमके बोलले, ज्याचा थेट आणि प्रचंड सकारात्मक प्रभाव अनेक संस्थाचालकांवर पडला. खासदार पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील आपले जुने सहकारी कमलकिशोर कदम, डॉ. माधव किन्हाळकर यांच्याशी संपर्क साधलाच, शिवाय दिवंगत नेते केशवराव धोंडगे यांच्या दोन्ही मुलांशीही चर्चा करून आपल्या उमेदवाराला पाठबळ मिळवले. विभागातील इतर अनेक प्रभावी संस्थाचालकांशी थेट संवाद साधून पवारांनी त्यांच्याकडील मतदार वर्ग डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या बाजूने पूर्णपणे वळविला. परभणीचे विजय गव्हाणे आणि नांदेडमधील गजानन पांपटवार यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे, तर मुक्तेश्वर धोंडगे यांनाही असा फोन आला असल्याची पुष्टी केली आहे. तसेच, नांदेड जिल्ह्यात महायुतीमधील राजकीय समिकरणामुळे पक्षादेशानुसार काही नेते एका बाजूने फिरत असले, तरी एका स्थानिक आमदारानेही डॉ. पाटील यांच्या विजयासाठी पडद्यामागे खूप जोर लावला होता, अशी चर्चा आता रंगली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत गंगापूर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना आपल्या पक्षाची उमेदवारी देत त्यांना विजय मिळवून देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता. परंतु, निवडणुकीनंतर ते पुन्हा अजित पवारांच्या गटामध्ये परतल्याची बाब शरद पवारांच्या अनेक निष्ठवान समर्थकांना चांगलीच खटकली होती. या नाराजीतूनच अनेक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी यंदा चव्हाणांचा पराभव घडवून आणण्यात मोठा हातभार लावल्याची चर्चा आहे. "पवारांचा एक कॉल आणि फिरला निकाल," असे या संपूर्ण राजकीय विजयाचे वर्णन केले जात आहे.
'पदवीधर'च्या या अटीतटीच्या निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आतिशबाजी करत मोठा विजयोत्सव साजरा केला. सोशल मीडियावर 'खा. शरदचंद्र पवारांचा हाबाडा' या मथळ्याखाली फिरणाऱ्या पोस्टमध्ये घरबसल्या संपूर्ण राजकीय चक्र फिरवणारे एकमेव चाणक्य नेता म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे. काँग्रेसचे संदीपकुमार देशमुख बारडकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांची भेट घेऊन त्यांचेखास अभिनंदन केले आहे.
शहर
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
- मुंबई: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी मध्य रेल्वे उभारणार पाच केंद्रे; वाडीबंदर, एलटीटी, पनवेल, कल्याण, इगतपुरीत प्रकल्प
महाराष्ट्र
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नांदेड: 'हौस किंवा मजेसाठी शेतकरी टोकाचं पाऊल उचलत नाही! आमदार गायकवाडांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर कडाडले
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!


























Subscribe to my channel




