Pune Police Transfer : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयुक्तांचे रात्री उशिरा आदेश

Pune Police Transfer : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे पोलीस आयुक्तालयातील २३ पोलीस निरीक्षक, १९ सहायक निरीक्षक आणि ७६ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश सोमवारी रात्री उशिरा काढले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे.

Talathi Exam : तलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच विभागांमध्ये बदलांचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनामध्ये ही खांदेपालट झाली आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर प्रस्थापित झालेल्या आणि पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप अथवा कोणालाही मदत होऊ नये, म्हणून अशा बदल्या करण्याचा प्रभात आहे. यंदा राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात तसे परिपत्रक काढले होते, त्याला अनुषंगून या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच आचारसंहिता जारी होण्याचे संकेत मिळत आहेत.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *