नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी वसतिगृह आणि शासकीय आश्रमशाळांमधील असुविधा, आरोग्य यंत्रणेचा अभाव आणि प्रशासकीय ढिसाळ कारभारावरून आधीच राज्यात आंदोलनांचे रान पेटलेले असतानाच, कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या आश्रमशाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ८ वर्षीय चिमुरड्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात व शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सृष्टी ओंकार सूर्यवंशी (वय ८, रा. गोळवाड, ता. सटाणा) असे मृत पावलेल्या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी आदिवासी विकास विभागाने तात्काळ कठोर पावले उचलत जबाबदार असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकणारी सृष्टी सूर्यवंशी हिला ३ सप्टेंबर रोजी अचानक तीव्र ताप आणि सतत उलट्यांचा त्रास होऊ लागला. प्रकृती खालावल्यामुळे शाळा प्रशासनाने तिला तातडीने प्राथमिक उपचारासाठी कळवण तालुक्यातील मोकमभणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत तिला पुन्हा विसापूर येथील शासकीय आश्रमशाळेत पाठवले. मात्र, ४ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास अचानक सृष्टीची प्रकृती पुन्हा अतिशय वेगाने बिघडली. तिला गंभीर अवस्थेत उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पालकांचे शाळा प्रशासनावर गंभीर आरोप आणि तीव्र संताप: चिमुरड्या मुलीच्या अकल्यित मृत्यूमुळे संतप्त झालेले पालक आणि आदिवासी विकास संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. पालकांनी शाळा प्रशासनावर आणि शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. मुलीच्या आजारपणाची किंवा प्रकृती बिघडल्याची कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती पालकांना वेळेवर देण्यात आली नाही, असा संताप पालकांनी व्यक्त केला. रात्री उशिरा दीड वाजता अचानक फोन करून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शाळेत असताना तिच्यावर नेमके कोणते उपचार करण्यात आले, तिला रुग्णालयात आणण्यास जाणीवपूर्वक किंवा दिरंगाईने उशीर झाला का, असे संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात आले. जोपर्यंत दोषी व्यक्तींवर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली. काहींनी हा मृतदेह थेट आदिवासी आयुक्तालयात नेण्याचा इशाराही दिला होता.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




