
पालघर : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग धोकादायक वळण आणि ब्लॅक स्पॉटमुळे दिवसागणिक धोकादायक होत चालल्याचं पाहायला मिळतंय. अशाच धोकदायक स्थितीमुळे रोजच्या अपघातांच्या प्रमाणात देखील लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यातच गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी पालघरच्या मेंढवन घाटात कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तिघेही एकाच कुटुंबातील असून यामध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीचा देखील समावेश आहे. तसेच या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आलीये. जखमींवर सध्या उपचार सुरु असून यामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा माहामार्ग तयार झाल्यापासून शेकडो जणांनी आपले प्राण गमावलेत. दरम्यान आता झालेल्या अपघातातील लोकं हे पुण्याचे होते.
|
Pandharpur : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत दोन वर्षाची चिमुकली पडली अन् भाविकांत गाेंधळ उडाला, अखेर... |
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार 23 नोव्हेंबर दुपारी पालघरच्या मेंढवन घाटात भीषण अपघात झाला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील ताबा सुटला. त्यामुळे ही कार मेंढवन घाटातील धोकादायक वळणावरुन विरुद्ध दिशेला जाऊ लागली आणि समोरुन येणाऱ्या टँकरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये संपूर्ण कारचा चुराडा झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जण गंभीर जखमी झालेत. हर्षद गोडबोले (वय 42), आनंदी गोडबोले (वय 5) आणि वाहन चालक मिलिंद वैद (वय 43) अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तसेच तर हर्षदा गोडबोले (वय 37), अद्वैत गोडबोले ( वय 12) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान हे सगळे जण पुण्यातील रहिवाशी होते.
अद्याप कोणत्याही उपाययोजना नाहीत?
पालघरजवळ असलेल्या मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या याच वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाल्याची माहिती समोर आलीये. तरीही या धोकादायक वळणावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याही उपाययोजना नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. आतापर्यंत याच जागेवर शेकडो लोकांनी प्राण गमावेलत. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी सध्या स्थानिकांकडून करण्यात येतेय.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


