
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मावळ आणि पिंपरी चिंचवडमधील विश्वासू सहकारी संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित वाघेरे यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला.मुंबईत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. "उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवसेनेत प्रवेश दिला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कोरोनाच्या साथीमध्ये महाराष्ट्र मध्ये कोरोनाला आपण रोखू शकलो. त्यांनी उत्तम प्रकारे राज्याला मार्गदर्शन केलं", असे संजोग वाघेरे म्हणाले. वाघेरे यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संजय राऊत काय म्हणाले?
पन्नास खोके आणि इकडे स्कॉर्पियो बुलेरो लाथाडून संजोग हे शिवसेनेत आलेले आहेत. शिवसेनेच्या या परिवारात उद्धव ठाकरे यांनी सामावून घेतलंय. आम्ही शिवसेनेच्या बाबतीत भावूक आहोत पण आता आपल्याला लढायचं आहे, असे संजय राऊत म्हणाले. 2023 मावळताना शिवसेनेचा सूर्य 2024 मध्ये तेजाने उगवताना दिसेल. मावळ मतदारसंघ आपल्याला परत खेचून आणायचा आहे. याची जबाबदारी संजोगजी तुमच्याकडे आहे. ज्यांनी महाराष्ट्रचा, मातोश्रीचा अपमान केला, त्यांना आता आपली ताकद दाखवायची आहे, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मला भेटल्यावर तुम्ही भावूक झाला म्हणालात. मला भावूक आणि घाऊक याचा फरक कळायला लागला. ज्यांनी 50 खोके घेतले त्यांना आता खोक्यामध्ये बंद करायचं आहे. गद्दार आणि स्वाभिमानी हा फरक संजोग यांनी दाखवला.
जिथे सत्ता असते तिथे गर्दीचा ओघ असतो. पण इथे वेगळे आहे. मला प्रचाराला यायची तिकडे गरज नाही. आजच भगवा तिकडे मावळमध्ये फडकला. हा मावळ मतदार संघ वेगळा आहे. मी प्रचाराला तर येईलच. त्यांच्याकडे पर्याय कोणी नाहीये.नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व 10 वर्ष पाहिले आहे. होऊ दे चर्चा कार्यक्रम गावागावात सुरू करा. आता निवडणूक कशी जिंकायची हे मला सांगायची गरज नाही. जिथे शिवाजी महाराज जन्माला आले तिथे आता गद्दारी गाडायची आहे.
संजोग वाघेरे कोण आहेत?
# माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे ते पुत्र आहेत.
# संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक राहिलेत
# महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिलाय
# त्यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्या
# स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले आहे
# संजोग वाघेरे राष्ट्रवादी चे सलग 8 वर्षे शहराध्यक्ष राहिलेत
#शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं
शहर
- पालिकेच्या शाळांत नियमांना हरताळ: सकाळीच शाळा भरल्याने चिमुकले बाकावरच झोपले!
- कोल्हापुरात राजकीय भूकंप! भाजप नगरसेवक रिंकू देसाईंचे पद धोक्यात; जात वैधता प्रमाणपत्रावरून कायदेशीर पेच.
- पुणे: सिंहगड रोडवर, पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; वनविभाग, RESQ आणि महापालिकेची 'मिशन रेस्क्यू' सुरू!
- खिद्रापूरचा संघर्ष तीव्र! ७१ घरे पाडण्याच्या आदेशाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच; पर्यटकांसाठी मंदिर खुले.
महाराष्ट्र
- विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेच्या ५४ विशेष गाड्या; १ जुलैपासून आरक्षण सुरू.
- पालिकेच्या शाळांत नियमांना हरताळ: सकाळीच शाळा भरल्याने चिमुकले बाकावरच झोपले!
- कोल्हापुरात राजकीय भूकंप! भाजप नगरसेवक रिंकू देसाईंचे पद धोक्यात; जात वैधता प्रमाणपत्रावरून कायदेशीर पेच.
- पुणे: सिंहगड रोडवर, पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; वनविभाग, RESQ आणि महापालिकेची 'मिशन रेस्क्यू' सुरू!
गुन्हा
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अलाहाबाद: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदाराकडून 'पोटगी' मागता येणार नाही!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- पश्चिम बंगालचा मोठा निर्णय! ओबीसी आरक्षणात बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; १७% वरून ७% वर आरक्षणाची मर्यादा.
- जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! ऐतिहासिक वारसा जपणारी घरे आता बनणार 'हेरिटेज होमस्टे'; सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान.

























Subscribe to my channel



