
Bageshwar Dham : शहरात पुढील महिन्यात होणाऱ्या अध्यात्मिक गुरु धिरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर 'बाबां'च्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध करण्यात येत आहे. तसेच चमत्कारिक दावा करणाऱ्या बागेश्वर बाबां'च्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील अंनिसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजक केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड आणि छत्रपती संभाजीनगर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निवेदन देण्यात आले आहे.
06 ते 08 नोव्हेंबर या कालावधीत अध्यात्मिक गुरु बागेश्वर बाबा यांचा शहरात कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाची मोठमोठे फ्लेक्स शहरात लागलेले आहेत. या कार्यक्रमाच्या संयोजानामध्ये केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड हेही असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या अयोध्या नगरी मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी जोरदार तयारी देखील करण्यात येत आहे. तब्बल 100 एकर परिसरावरती भव्य मंडप आणि किमान दहा लाख नागरिकांना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. तसेच, तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असून या तीन दिवसांमध्ये बाबांचा दरबार भरणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आधीच बागेश्वर बाबा यांच्या दरबाराला धश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे.
|
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस; विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी |
अंनिसचे पोलिसांना निवेदन...
महाराष्ट्र अंनिसच्या संभाजीनगर शाखेच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "धिरेंद्र कृष्ण शास्त्री, (बागेश्वर धाम, मध्य प्रदेश) हे अध्यात्माच्या नावाने करीत असलेले चमत्कारांचे दावे, फलज्योतिषाचा प्रचार, प्रसार, स्वत:कडे कोणतीही वैद्यक शास्त्राची पदवी नसताना लोकांच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींवर उपाय सांगणे, छ्द्मविज्ञानाचा वापर हे सर्व भंपक प्रकार भारतीय संविधानात प्रत्येक भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्याशी पूर्णपणे विसंगत आहेत. शिवाय आतापर्यंत त्यांनी अध्यात्माच्या नावाने मोठमोठ्या जनसमुहासमोर जेही कार्यक्रम देशात ठिकठिकाणी केलेले आहेत ते प्रसारमाध्यमांत यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यांचही सखोल तपासणी करावी. तसेच त्यांच्यावर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी."
व्हिडीओ शुटींग करून कायदेशीर कारवाई करावी...
बागेश्वर बाबा यांच्या अशास्त्रीय दाव्यांमुळे जादूटोणा विरोधी कायदा तसेच फसवणुकीविरूधी कायदा, ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज (आक्षेपार्ह जाहिराती) अॅक्ट 1954, मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट अशा कायद्यातिक कलमांचा भंग होतो. असे महाराष्ट्र अंनिसचे म्हणणे असून त्यानुसार त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच असा चमत्कारिक दाव्यांचा कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. तसेच, राजकीय दबावापोटी जर कार्यक्रम झालाच तर, त्या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग करावे. ते तपासून त्यानंतर सदर कायद्यानुसार धिरेंद्र शास्त्री बाबावर कायदेशीर कारवाई करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



