मुंबई : देशभरात पसरलेल्या आणि सुरक्षा यंत्रणांची झोप उडवणाऱ्या एका अत्यंत मोठ्या सायबर फसवणुकीच्या व 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) रॅकेटचा सक्तवसुली संचालनालयाने (ED) पर्दाफाश केला आहे. तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक उलाढालीशी संबंधित असलेल्या या मनी लाँडरिंग प्रकरणातून ईडीने मुंबईतून दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक कारवाईमुळे देशभरातील सायबर गुन्हेगारीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गोव्यातील एका महिलेची डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून तब्बल २.६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी हा तपास सुरू करण्यात आला होता. या प्रकरणात तपास करत असताना ईडीच्या हाती एका प्रचंड मोठ्या आंतरराज्यीय आणि देशव्यापी सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा सुगावा लागला. या रॅकेटद्वारे देशभरात तब्बल ३० हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या नेटवर्कविरुद्ध देशातील तब्बल २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे १५० ते १६० गुन्हे (FIRs) दाखल असून, ३०० हून अधिक पीडितांच्या तक्रारी यामध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. या माध्यमातून एकूण ४,००० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काय आहे ड्रायव्हर आणि नोकरांचा बनावट कंपन्यांचा खेळ? ईडीच्या तपासात या सायबर गुन्हेगारांची अत्यंत चलाख मोडसॉपरेंडी (Modus Operandi) समोर आली आहे. या टोळीने बनावट किंवा शेल कंपन्या (Shell Companies) तयार केल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, या कंपन्या कागदावर मोठ्या दाखवण्यात आल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात या कंपन्यांचे संचालक म्हणून सामान्य ड्रायव्हर, वाहनचालक आणि साध्या नोकऱ्या करणारे कर्मचारी यांना पुढे केले गेले होते. हे सर्व लोक छोट्या खोल्यांमध्ये किंवा सिंगल-रूम आकलमेशनमध्ये राहणारे आहेत, ज्यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार चालवला जात होता.
पीडित लोकांकडून उकळलेली रक्कम बँक खात्यांमध्ये जमा केली जात असे, त्यानंतर ती तातडीने रोख स्वरूपात (Cash) काढून आरबीआय-परवानाधारक मनी चेंजरच्या माध्यमातून परदेशी चलनात रूपांतरित केली जात होती. ईडीने या प्रकरणी मुंबई आणि गोव्यात छापेमारी करत आतापर्यंत सुमारे ३.२5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या रॅकेटमधील फहीम मोईन हुसेन सैयद आणि नईम मुईन सैयद या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली असून, पुढील कसून चौकशी सुरू आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



