अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. एकीकडे पत्नी सुनीता अहुजाकडून त्याच्यावर विवाहबाह्य संबंधासारखे गंभीर आरोप होत असताना दुसरीकडे गोविंदा चक्क दिवाळखोरीत गेल्याची चर्चा सुरू झाली. गोविंदाचा पडता काळ सुरू झाल्याचं अनेकांनी म्हटलं आणि यासंदर्भातील बातम्याही समोर आल्या. आता यावर त्याचा भाचा विनय आनंदने प्रतिक्रिया दिली आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत विनयने गोविंदाविषयीच्या या सर्व अफवांना फेटाळलं आहे. अशा गोष्टी इतक्या प्रमाणात कशा पसरवल्या जातात, असा सवाल करत त्याने आश्चर्य व्यक्त केलं.
विनय आनंद म्हणाले, “तो सुपरस्टार आहे. गोविंदा आजसुद्धा जिथे उभा राहतो, तिथे त्याला 25 ते 30 लाख रुपये आरामात मिळतात. हे लोक ज्याला गरीब म्हणत आहेत, ते मूर्ख आहेत. लोक लिहितायत की गोविंदा रस्त्यावर आलाय, गोविंदासोबत हे घडलंय, ते घडलंय. अरे मूर्खांनो.. कोणाबद्दल तुम्ही ही बडबड करत आहात? तो नव्वदच्या दशकातील सुपरस्टार आहे, जो लाखोंची कमाई करतोय. जेव्हा अंधेरीतल्या लोखंडवाला परिसरातील फ्लॅटची किंमत 12 ते 13 लाख रुपये होती, तेव्हा गोविंदा त्याच्या चित्रपटासाठी एक कोटी रुपये मानधन घ्यायचा. मग तो दिवाळखोरीत कसा जाईल? गोविंदाने पाच चित्रपटांमधून जेवढी कमाई केली, तेवढी कदाचितच कोणी कमाई केली असेल. असे कितीतरी स्टार्स फिरत असतील, ज्यांच्याकडे पैसे नाहीत. मला त्याच्याबद्दल ऐकूनच खूप अजब वाटतं.”
“हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं की आपल्या देशात कसे लोक आहेत? मीडिया कोणत्या प्रकारच्या कहाण्या लिहितोय, तेसुद्धा फक्त पब्लिसिटीसाठी. मी सोशल मीडियावर उघडतो तेव्हा गोविंदाच दिसतो. अरे, हे कशा पद्धतीचं स्टारडम आहे”, असं तो पुढे म्हणाला.
याआधी गोविंदाच्या मॅनेजरने दिवाळखोरीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले होते, “गोविंदाचं खाजगी कार्यक्रम, शाळांमधील डान्स आणि टॅक्सीने प्रवास यांचा त्याच्या आर्थिक अडचणींशी काही संबंध नाही. गोविंदाकडे फक्त एकच नाही तर अनेक गाड्या आहेत. त्याच्या दिवाळखोरीच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. परफॉर्मन्स हा त्याचा बिझनेस आहे. त्यामुळे तो दिवाळखोरीत आहे असा अर्थ होत नाही. त्यावेळी विमानतळावर खाजगी वाहनांना परवागनी नव्हती. तो अजूनही त्याच्या पत्नी आणि मुलांची काळजी घेतो.”
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



