
Pune : वहिनीला चहा करायला सांगून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ४३ वर्षांच्या चुलत दीराला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावली. आरोपीविरोधात पीडितेने नोंदविलेली साक्ष विश्वासार्ह व ठोस असून, तिला पती आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष व न्यायवैद्यक तपासणी अहवालाने दुजोरा दिला आहे. त्यामुळे केवळ पीडितेच्या विश्वासार्ह साक्षीच्या आधारेही आरोपीला दोषी ठरविता येऊ शकते, या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा दाखला देऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला.
काय घडलं नेमकं?
पीडितेने या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना १४ जून २०२४ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बारामती येथील प्रगतीनगर परिसरात पीडितेच्या घरात घडली.
पीडितेचे पती सुरक्षारक्षक आहेत, तर आरोपी कामगार आहे. घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजता आरोपी पीडितेच्या घरी आला. त्या वेळी पीडितेचे पती कामावर गेले होते. पीडितेने आरोपीला चहा दिला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पीडिता पुन्हा चहा करण्यासाठी गॅसजवळ गेली असता, आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने पतीच्या कामाच्या ठिकाणी धाव घेतली. पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
आरोपीकडून पीडितेवर दबाव
या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील के. एस. नवले यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा बचाव केला. मात्र, आरोपीच्या परिचयाचे लोक पीडितेला साक्ष फिरविण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पीडितेच्या पतीने न्यायालयात सांगितले. गुन्ह्याचे स्वरूप व गांभीर्य आणि आरोपीने एका असहाय महिलेविरुद्ध गुन्हा केला आहे, ही बाब लक्षात घेऊन त्याला शिक्षा देणे न्याय्य ठरेल, असे नमूद करून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली; तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला भरपाई देण्याचा आदेशही दिला.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



