Afghanistan Blast : अफगाणिस्तानातील हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 3 लोकांचा मृत्यू,7 जखमी

काबुल- अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील एका हॉटेलमध्ये स्फोट झालाय, यात तीन लोकांचा मृत्यू झालाय तर सात लोक गंभीर जखमी झाल्याचे कळत आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पाकिस्तानला लागून असलेल्या भागातील ही घटना आहे. या क्षेत्रात संघर्षाचा इतिहास असून इस्लामी दहशतवादी आणि त्यांच्या शत्रूमध्ये झटापटी होत असतात. याठिकाणी वेगवेगळ दहशतवादी गट सक्रीय आहेत. माहितीनुसार, जखमींमध्ये पाकिस्तानच्या वजीरिस्तान भागातील लोकांचा समावेश आहे. 

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागल्याने कार पलटी, कारचा अक्षरश: चक्काचूर

पाकिस्तानच्या दुतावासाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून विरोध सहन करावा लागत आहे. आयएसने गेल्या काही महिन्यांमध्ये नागरिक, परदेशी नागरिक आणि तालिबानी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करुन त्याची जबाबदारी घेतली आहे. तालिबानकडून आयएसचा प्रतिकार केला जात असून त्यांच्या अनेक अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *