
Pune : पश्चिम भागातील रिंग रोडच्या कामाला गती येत असताना पूर्व भागातील चाकण आणि तळेगाव भागातील कामाला तीन महिने विलंब झाला आहे. त्यामुळे दोन्ही पॅकेजच्या कामाचा कंत्राट घेतलेल्या संबंधित एका बड्या कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नोटीस जारी केली आहे. दररोज सव्वा कोटी रुपये दंडाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचे धाबे दणाणले आहेत.
पूर्व भागांत चार टप्प्यांत काम सुरू
राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत रिंग रोडचे काम वेगाने सुरू आहे. पश्चिम भागातील रिंग रोडचे पाच, तर पूर्व भागात चार टप्प्यांत काम सुरू आहे. त्यापैकी रहाटणी जवळील कल्याण येथे दुहेरी बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. दोन्ही बाजूने सुमारे अडीच किलोमीटर अंतरापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईहून साताऱ्याकडे जाताना बोगद्यात प्रवेश करताना १४११ मीटर; तर कल्याणच्या बाजूला बाहेर पडतानाच्या बोगद्याचे १४२८ मीटर इतके काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा चौथ्या टप्प्यांतंर्गत करण्यात येत आहे.
बोगद्याची खोदाईचे काम काही प्रमाणात पूर्ण झाल्याने बोगद्याची आतील वरील बाजूस शॉर्ट किट मारण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाच्या खोदाईचे काम सुरू आहे. त्यामुळे पश्चिम भागातील रिंगरोडचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर पूर्व भागातील काम साधारणतः १२ ते १५ टक्के पूर्ण झाले आहे. पश्चिमेच्या तुलनेत पूर्वेकडील काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.
पश्चिमेकडील दुसरा, तिसरा, चौथा टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे, तर पूर्वेकडील चौथ्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाला गती आहे. नोटीस जारी केलेल्या कंपनीने पूर्वेकडील पहिला आणि तिसरा टप्पा आणि पश्चिमेकडील पहिल्या टप्प्याच्या कामाचे कंत्राट घेतले आहे. दोन्हीकडील कामांना गती देण्याची सूचना महामंडळाने केली आहे.
विलंब होतोय, दंड का नको?
पूर्व भागात चार टप्प्यांत काम होणार आहे. त्यापैकी पहिला आणि तिसऱ्या या टप्प्यातील म्हणजेच चाकण आणि तळेगाव येथील काम अत्यंत हळू सुरू आहे. त्यामुळे या कामास विलंब होत असल्याकडे कंपनीचे लक्ष वेधून रस्ते विकास महामंडळाने नोटीस बजावली आहे. सद्यस्थितीतील कामाची प्रगती पाहता तीन महिने कामास विलंब झाला आहे. त्यामुळे या कामाची गती वाढवावी, अशी सूचना करण्यात आली आहे; तसेच कामास विलंब होत असल्याने दररोज सव्वा कोटी रुपयांचा दंड का आकारण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस जारी केली आहे. त्याबाबत कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




