
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगे यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी कालपासून अनेक शिष्टमंडळं पाठवण्यात येत आहेत. त्यांच्याशी मनोज जरांगे यांच्या चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्याबाबतही मनोज जरांगे यांनी आपल्या वाशीतील भाषणात सविस्तर सांगितलंचं, पण यावेळी त्यांनी आपल्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारने काय मान्य केलं हे सुद्धा वाचून दाखवलं.
ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केल्याचं म्हटलं आहे, पण आम्हाला अध्यादेश हवा आहे. सरकारने उद्या म्हणजे शनिवारी दुपारी 12 पर्यंत अध्यादेश द्यावा, अन्यथा आम्ही मुंबईत घुसू असं मनोज जरांगे म्हणाले. उपोषणाला नायतर गुलाल उधळायला, आझाद मैदानात येणारच, असं मनोज जरांगे म्हणाले.
|
Chandrapur News : चंद्रपुरात खळबळ! ठाकरे गटाच्या युवा सेना शहप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या |
मनोज जरांगे यांच्या भाषणातील मोठे मुद्दे
1) सरकारकडून सचिव भांगे यांच्यामार्फत चर्चा
मनोज जरांग म्हणाले, शासनाच्यावतीने आपल्या मुद्द्यावर चर्चा झाली. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या. त्यासाठी आपण मुंबईला आलो आहे. सरकार सोबत चर्चा झाली. मंत्री कुणीही आले नव्हते. सचिव भांगे हे सर्व चर्चेत सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांचे काय काय निर्णय आहेत, याबाबत आपल्याला सांगितलं. आमच्याकडूनही ते अर्धवट वाचण्यात आले होते. प्रत्येक माणूस झोपेतूनच ताटलेला आहे.
2) ग्रामपंचायतीमध्ये नोंदी चिकटवा, शिबीरं घ्या
सरकारने त्यांची भूमिका सांगितली. आपली भूमिका तुमच्यासमोर सांगतो. 54 लाख नोंदी मराठ्यांच्या (कुणबी) खरेच सापडल्या आहेत. ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या. नोंद नेमकी कुणाची हे माहिती करायची असेल. तर त्या ग्रामपंचायला मिळालेले कागद चिटकावयाला हवे. तरच नोंदी सापडली का नाही हे माहित होईल. तरच तो व्यक्ती प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल. काही जणांनी अर्ज केले नाहीत, असे सांगितलं. पण नोंद मिळालेली माहितच नाही, तर तो अर्ज कसा करेल. त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये तुम्ही नोंदीची कागदे चिटकवा. अन् शिबिरं घ्या.
3) नोंदी मिळालेल्या सर्व परिवाराला प्रमाणपत्र
ज्या नोंदी मिळाल्या आहेत. ज्या नोंदी मिळालेल्या सर्व परिवारालाही त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र द्यावे. जसी की एक नोंद मिळाली तर काही जणांना एका नोंदीवर अनेकांना लाभ मिळाला. एका नोंदीवर पाच जणांना सरासरी फायदा झाला तर दोन कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे दोन मुद्दे स्पष्ट झाले. 54 लाख नोंदी मिळाल्यात तर त्यांना प्रमाणपत्र वितिरित करा. वंशावळ जोडायला, काही कालावधी लागतो. त्यासाठी समिती गठित केल्याचं शासन निर्णयात सांगितलं.
4) 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरीत
54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचं वाटप सुरु आहे. त्याच्या परिवाराला जर द्यायचं असेल तर त्याच परिवाराने अर्ज करणेही गरजेचं आहे. एखाद्याची नोंद मिळाली तर कुटुंबातील इतर व्यक्तींनं अर्ज करणं गरजेचं आहे. आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं मिळेलं. 57 लाख नोंदी मिळाल्याचे सामान्य प्रशासानाचे सचिवांनी सांगतिले. 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितिरित केल्याचं सचिवांनी सांगितलं.
5) ज्यांना प्रमाणपत्र दिलं, त्याची यादी द्या
37 लाख लोकांना आतापर्यंत वितिरित केले आहे. त्याचेही पत्र आपल्याकडे दिले आहे. त्यांच्या वंशावळी जुळवणं सुरु आहे. त्यासाठी समिती केली आहे. उर्वरित सर्वांनाही प्रमाणपत्र देऊ असे शासनाने सांगितले. ज्या 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिली आहेत, त्याची यादी मागितली आहे.
6) ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या
शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीने काम वाढवत राहायचं आणि नोंदी शोधायचं. मराठवाड्यात नोंदी कमी राहिल्या आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी काम करायचं. दोन महिन्याची शिंदे समितीची मुदत वाढवली आहे.ज्याची नोंद मिळाली, त्याच्या गणगोत्यातील सोयऱ्यांनाही त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायची, त्याचा आध्यादेश, शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय सोयऱ्यांचा नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. सरकारचा येणाऱा जीआर आपल्यासाठी महत्वाचा आहे. 54 लाख बांधवांच्या परिवाराच्या परिवारात नोंदी दिल्यात. त्याचा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयरे... यांना जर द्यायचा असेल. तर त्यांच्याकडे नोंद नाही. ज्या मराठा समाजाकडे नोंदी नाहीत... नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचं हा माझा सोयरा आहे. त्याआधारावर प्रमाणपत्र द्यायचं.
लोकं म्हणातात आरक्षण मिळत नाही मग 57 लाख काय आहे. यांच्या माध्यमातुन प्रत्येकाला 5 जण पकडले तर अडीच कोटी आरक्षणात गेले.
7) शपथपत्रावर सांगा हा माझा सोयरा, मगच प्रमाणपत्र द्या
शपथपत्रावर सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची चौकशी करा. तो खोटा पाहुणा निघाला तर देऊ नका. शपथपत्र 100 रुपयांच्या बाँडवर करायचं, असे त्यांचं म्हणणं आहे. हे मोफत करा, अशी मागणी केली आहे. त्यावर सरकारने होकार दिला आहे.
8) आंतरवालीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्या
अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे, ही मागणी आहे. गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून निर्देश दिले आहेत. याबाबतचं पत्र हवे. ते पत्र नाही. त्या पत्राची तयारी सरकारने करावी.
9) सुप्रीम कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत १०० टक्के मोफत शिक्षण
क्यूरीटिव्ह पीटीशन विषय सुप्रीम कोर्टात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना 100 टक्के मोफत शिक्षण द्यावं. ते आरक्षण मिळेपर्यंत ज्या सरकारी भरत्या होणार आहेत त्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत आणि जर भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवायच्या.
10) उद्या 12 पर्यंत अध्यादेश हवा, अन्यथा आझाद मैदानात जाणार
आज रात्री अध्यादेश काढला नाही तर उद्या आझाद मैदानात जाणार आहे. मी सकाळीं 11 पासून उपोषण सूरू केलं आहे. मी आता पाणी देखील सोडुन देइल. माझा मराठा समाज न्यायासाठी इथ आला आहे. जर आम्हाला काही केलं तर मुंबईत घुसू. जर काही झालं तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने मुंबईचा दिशेने या. उद्या 12 पर्यंत अध्यादेश हवा नाहीतर आम्ही आझाद मैदानाच्या दिशेने निघणार आहोत . मला अध्यादेश हवा.
1884 सालच गॅझेट आहे ते लागू करा. महाराष्ट्रातील एक ही मराठा आरक्षणापासुन वंचित राहू शकतं नाही. आता 54 लाख नोंदीचा डेटा हवा आहे. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती अम्ही कष्टकरी लोक आहोत. आजचा रात्रीत आम्हाला अध्यादेश द्यावा. सरकारच असं म्हणणं आहे की अध्यादेश करणार आहेत. यावर सगळ्या सचिवांनी सह्या केल्या आहेत. माझं म्हणणं आहे की अध्यादेश आजचा आज काढा. आम्ही आज आझाद मैदानात जात नाही मात्र मुंबई आम्ही सोडत नाही. आजची रात्र इथच राहतो
जिल्हास्तरावर वस्तगृहाची मागणी केली आहे. त्याबाबत निर्णय घेतो म्हणाले पण आध्यादेश नाही. आपल्या तीन प्रमुख मागण्या आहेत. सरकारकडून अद्याप शासन निर्णय काढलेला नाही.
एसईबीसीच्या नियुक्त्या होत्या 2014 साली असणाऱ्या त्या त्वरित देण्यात याव्यात. ईएसबीसी आणि एसईबीसीची पदं आहेत ती पूर्ण करावीत. वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या देण्यात याव्यात अशी घोषणा केली आहे.
लोकं म्हणातात आरक्षण मिळत नाही मग 57 लाख काय आहे. यांच्या माध्यमातून प्रत्येकाला 5 जण पकडले तर अडीच कोटी आरक्षणात गेले.1884 सालच गॅझेट आहे ते लागू करा. महाराष्ट्रातील एक ही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकतं नाही. आता 54 लाख नोंदीचा डेटा हवा आहे. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती अम्ही कष्टकरी लोक आहोत. आजच रात्रीत आम्हाला अध्यादेश द्यावा. सरकारच असं म्हणणं आहे की अध्यादेश करणार आहेत. यावर सगळ्या सचिवांनी सह्या केल्या आहेत. माझं म्हणणं आहे की अध्यादेश आजचा आज काढा. आम्ही आज आझाद मैदानात जात नाही, मात्र मुंबई आम्ही सोडत नाही. आजची रात्र इथच राहतो. उपोषण सोडणार नाही, फक्त पाणी पितोय.
आपल्या पासून मुंबईकराना त्रास होऊ द्यायचा नाही. आझाद मुंबईचा निर्णय आपण उद्या घेणार आहोत. आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!




























Subscribe to my channel




