
Mumbai : हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटापूर्वी बंधनकारक असलेला सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची विभक्त पत्नी धनश्री वर्मा यांनी केलेली मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केली. तसेच, चहल हा आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळणार आहे. त्यामुळे, काही काळ तो सुनावणीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. शिवाय, त्याला कोणत्याही ताण तणावाविना आयपीएलमध्ये सहभाग घेता यावा याचा विचार करून त्यांच्या परस्पर संमतीने दाखल केलेल्या घटस्फोट अर्जावर गुरुवारीच निर्णय घेण्याचे आदेश न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने दिले.
चहल आणि धनश्री गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत आहेत आणि पोटगी देण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करताना झालेल्या संमतीच्या अटींचे पालन झाले आहे. हे लक्षात घेऊन एकलपीठाने उपरोक्त आदेश दिला.
विभक्त होऊ पाहणाऱ्या जोडप्यांमध्ये तोडगा निघू शकतो की नाही याची पडताळणी करण्यासाठी कूलिंग-ऑफ कालावधीची तरतूद आहे. तसेच, ही तरतूद बंधनकारक आहे. परंतु, जोडप्याला हा कालावधी माफ करून हवा असेल आणि दोघांमधील वाद मिटण्याची शक्यता नसेल तर हा कालावधी माफ केला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये याबाबत निकाल दिला होता. त्याचीच दाखल एकलपीठाने चहल आणि धनश्री यांची याचिका मान्य करताना दिला. चहल आणि धनश्री दोघेही यावेळी न्यायालयात उपस्थित होते.
चहल आणि धनश्री यांचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले आणि जून २०२२ मध्ये ते वेगळे झाले. त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी संयुक्त अर्ज दाखल केला होता. तसेच, त्यांनी कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. कौटुंबिक न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी बंधनकारक कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती नाकारली.
चहल आणि धनश्री यांच्यातील संमतीच्या अटींचे अंशतः पालन झाल्याने कुटुंब न्यायालयाने हा निर्णय दिला. चहल याने धनश्रीला ४.७५ कोटी रुपये अंतिम पोटगी म्हणून द्यायचे आहेत आणि त्याने आतापर्यंत २.३७ कोटी दिले आहेत, असेही कुटुंब न्यायालयाने आदेशात नमूद केले. कौटुंबिक न्यायालयाने विवाह समुपदेशकाच्या अहवालाचाही हवाला दिला. त्यात, मध्यस्थीच्या प्रयत्नांचे केवळ अंशतः पालन झाल्याचे म्हटले होते.
संमतीच्या अटींचे पालन
उच्च न्यायालयाने कटुंब न्यायालयाच्या निर्णयामुळे चहल आणि धनश्री यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कुलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. घटस्फोटाच्या आदेशानंतर, कायमस्वरूपी पोटगीचा दुसरा हप्ता देण्याची तरतूद असल्याने संमतीच्या अटींचे पालन होत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आणि चहल व धनश्री यांची कुलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती मान्य केली. तसेच, दोघांच्या घटस्फोटाच्या अर्जावर गुरुवारपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




