
Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजीउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या नावे संस्था, ट्रस्ट, फाउंडेशन नोंदणी किंवा सार्वजनिक ठिकाणी पुतळे व स्मारके उभारण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करावे, असे प्रसिद्धीपत्रक उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून काढण्यात आले आहे.
दादांच्या नावाचा गैरवापर होण्याची भीती
अजित पवार यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे असून जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अनेक जण संस्था, ट्रस्ट किंवा स्मारके उभारण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या नावाचा चुकीचा किंवा व्यावसायिक वापर होण्याची शक्यता आहे.
कुटुंबीयांचे लेखी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र बंधनकारक
दिवंगत अजित दादांच्या नावाने कोणतीही नवीन संस्था, ट्रस्ट किंवा फाउंडेशन नोंदणी करताना कुटुंबीयांची लेखी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारके उभारण्याबाबत सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, जागेच्या मालकी हक्काचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पत्रकात काय काय?
अजित पवार यांच्या नावाचा वापर करून अनधिकृत निधी गोळा करणाऱ्या किंवा संशयास्पद कामकाज करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी करावी. आधीपासून अस्तित्वात असलेल्या संस्थांनी नाव बदलून स्व. अजित दादा पवार यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही हेच नियम लागू करावेत, असेही याबाबतच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यासाठी जात असताना 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत निधन झाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाध्यक्ष पदासह महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
शहर
- सातारा: शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅस गळती; चौघांची प्रकृती बिघडली, मोठा अनर्थ टळला
- सांगली: बसमध्ये १२ किलो गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई, तस्करीचे धागेदोरे तपासात
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
महाराष्ट्र
- सातारा: शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅस गळती; चौघांची प्रकृती बिघडली, मोठा अनर्थ टळला
- सांगली: बसमध्ये १२ किलो गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई, तस्करीचे धागेदोरे तपासात
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
- नागपूर: 'आई-वडील वेगळे होऊ शकतात, पण जबाबदारी नाही ' खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- नांदेड: मृत्यूपूर्वी शिक्षकाचा WhatsApp स्टेटस चर्चेत; चार शिक्षण अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
- मुंबई: '12 लाख द्या, नवऱ्याला सोडते' प्रेयसीची पत्नीकडे मागणी; धक्कादायक प्रकरण पोलिसांत
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय























Subscribe to my channel



