Pune News : पुण्यात मामासोबत पोहायला गेलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू, हडपसर भागातील धक्कादायक घटना

Pune : पुण्यातील हडपसरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. येथे एका इयत्ता ९ वी मध्ये शिकत शकता असलेल्या मुलाचा पुण्यात स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा शिंदे (१६) असे तलावात बुडून मुत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा हा हडपसर भागात राहायला असून तो जवळ असलेल्या साधना शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिकत होता. साधना शाळेच्या गेटच्या शेजारी एक जलतरण तलाव आहे. कृष्णा हा त्याच्या मामासोबत पोहायला गेला होता.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोहून झाल्यानंतर मामा स्विमिंग पुल मधून आले. दरम्यान, त्यांनी कृष्णा कुठे आहे शोधायला सुरुवात केली. मात्र कृष्णा दिसत नव्हता. कृष्णा हा त्याच्या कपड्यासह पाण्यात बुडाला असल्याचे दिसून येताच स्थानिकांनी त्याला बाहेर काढले. कृष्णाला जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल केले मात्र. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *