
KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका, मालमत्ता करात केलेली वाढ, ग्रोथ सेंटर रद्द करणे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था या मागण्याबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी बैठक झाली.
या बैठकीत २७ गावामधील मालमत्ता कराबाबत दिलासा देण्यासाठी तत्काळ समिती गठित करून शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संघर्ष समितीने आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुख्यमंत्री शिंदे संघर्ष समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे संघर्ष समितीने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सर्व पक्षीय संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. २७ गावांमध्ये मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे, ग्रोथ सेंटर रद्द करणे, भाल, भोपर गावातील डम्पिंग ग्राउंड रद्द करणे कल्याण शीळ रोड वरील बाधित शेतकऱ्यांना मोबदला देणे. आरोग्य व शिक्षण व्यवस्था सदृढ करणे, अशा काही मागण्या संघर्ष समितीकडून केल्या जात आहेत.
या मागण्यांसाठी संघर्ष समितीने केडीएमसी मुख्यालयावर धरणे आंदोलने केले होते. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे, युवासेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या सोबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत 27 गावातील मालमत्ता करा बाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करत तत्काळ अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना केली.
27 गावाच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मात्र यादरम्यान २७ गावात रस्ते पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण या मूलभूत सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच दिवा येथे आगरी कोळी वारकरी भवन, कल्याण शीळ रोडचे ह भ प संत सावळाराम महाराज नामकरण, संत सावळाराम महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात असल्याचे सांगितले.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




