Aiden Markram South Africa vs New ZealandImage Credit source: @ProteasMenCSA X Account
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध 7 विकेट्सने जबरदस्त असा विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्पर्धेतील 24 व्या सामन्यात 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान त्यांच्या फलंदाजांनी केलेल्या चाबूक बॅटिंगच्या जोरावर सहज पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 17 बॉलआधी 7 विकेट्स राखून हे आव्हान पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 17.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह सलग तिसरा विजय मिळवला आणि न्यूझीलंडच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावला.
दक्षिण आफ्रिकेची खास कामगिरी
दक्षिण आफ्रिकेने या विजयासह काही खास विक्रम आपल्या नावावर केले. दक्षिण आफ्रिकेची 2007 नंतर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 150 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच दक्षिण आफ्रिकेने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध विजयाची मालिका कायम ठेवण्यात यश मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा हा न्यूझीलंड विरुद्धचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग आणि एकूण पाचवा विजय ठरला.
कॅप्टन एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो
डॅरेल मिचेल आणि मार्क चॅपमन या जोडीने पाचव्या विकेटसाठी 23 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंड टीमने या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅप्टन एडन मारक्रम याने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सहज विजय मिळवला. एडन हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरला.
दक्षिण आफ्रिकेची कडक सुरुवात आणि धमाकेदार विजय
एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने 62 धावांची भागीदारी केली. क्विंटन आऊट होताच ही जोडी मोडीत निघाली. डी कॉक याने 20 धावा केल्या. त्यानंतर एडनने रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हीस आणि डेव्हिड मिलर यांच्यासोबत भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं. रायनने 21 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेव्हीस याने 21 धावांचं योगदान दिलं. तर एडन आणि मिलर ही जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयी करुन नाबाद परतली. मिलरने 24 धावा केल्या. तर मार्करमने 44 बॉलमध्ये 195.45 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 86 रन्स केल्या. एडनने या खेळीत 4 षटकार आणि 8 चौकार लगावले.
दक्षिण आफ्रिकेची सुपर 8 ची प्रतिक्षा कायम
दरम्यान दक्षिण आफ्रिका सलग 3 सामने जिंकल्यानंतरही सुपर 8 साठी क्वालिफाय झालेली नाही. डी ग्रुपमधील इतर 4 संघ अजूनही सुपर 8 च्या शर्यतीत आहेत. त्यामुळे अधिकृतपणे दक्षिण आफ्रिका सुपर 8 साठी पात्र ठरलेली नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेचं सुपर 8 साठी पात्र होणं औपचारिकता आहे, हे देखील तितकंच खरं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




