
Pune : महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पीय आराखड्यात शहरातील तसेच समाविष्ट गावांमधील रस्ते आणि पदपथांसाठी १५०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मिसिंग लिंकसह रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करणे, भूसंपादन, चेंबरची झाकणे समपातळीत आणण्याशिवाय समाविष्ट गावांमधील प्रत्येकी एक मुख्य रस्ता आणि पदपथ वर्षभरात विकसित केला जाणार आहे. या वर्षभरात ६५ किलोमीटरचे रस्ते नव्याने विकसित करण्याबरोबरच ‘अर्बन मोबिलिटी सेल’ची स्थापना केली जाणार आहे.
अर्थसंकल्पीय आराखड्यात पथ विभागासाठी १५०५ कोटी रुपये भांडवली तर ३६१ कोटी महसुली अशी एकूण १८६६ कोटी रुपये तरतूद सुचवली आहे. गशहराच्या विविध भागांत उड्डाणपूल, ग्रेडसेपरटेर, भुयारी मार्ग प्रस्तावित असून, आराखड्यात त्यासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाषाण-सुतारदरा आणि तळजाई-हिंगणे या बोगद्यांच्या कामासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, यंदा या बोगद्यांचा ‘श्री गणेशा’ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेले प्रकल्प
सनसिटी ते कर्वेनगर पूल (ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन)
शास्त्रीनगर चौक, बिंदुमाधव ठाकरे चौकातील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल -मार्च २०२७पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
प्रस्तावित महत्त्वाचे प्रकल्प
मुंढव्यातील महात्मा फुले चौकात ग्रेडसेपरेटर.
साखर संकुल परिसरात मुंबई-पुणे रस्त्याला जोडणारा उड्डाणपूल.
चांदणी चौक ते भुगाव दरम्यान नवीन उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर.
शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा उड्डाणपूल.
वनाझ ते चांदणी चौकात मेट्रोसमवेत उड्डाणपूल.
खडकी परिसरातील मुंबई-पुणे रेल्वेलाईनवरील दोन भुयारीमार्ग.
नगर आणि सोलापूर रस्त्यावर पादचारी भुयारी मार्ग.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
मुळा-मुठा नदीच्या ४४ किलोमीटर लांबीच्या पट्टयात पुनरुज्जीवनाचे काम वेगाने सुरू आहे.
संगमवाडी ते बंडगार्डन : ३.७० किलोमीटरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
बंडगार्डन ते मुंढवा : ५.३० किलोमीटर टप्प्याचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२६पर्यंत ते पूर्ण होईल.
स्मार्ट पार्किंग आणि स्ट्रक्चरल ऑडिट
पार्किंगची समस्या भेडसावू नये यासाठी 'जीआयएस मॅपिंग ऑफ पार्किंग रिझर्व्हेशन' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील सर्व पार्किंग स्लॉट्सची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. तसेच, शहरातील ९९ प्रमुख उड्डाणपूल, सब-वे आणि पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.तवर्षीच्या तुलनेत ही तरतूद पाचशे कोटी रुपयांची अधिक असून ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे.
मेट्रो आणि रेल्वे प्रकल्प
मेट्रो मार्गावरील अॅमिनिटी स्पेसवर पार्किंग विकसित करण्यासाठी ५ कोटींची तरतूद आहे.
खडकी रेल्वे स्थानकाजवळील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणामुळे गणेशखिंड आणि जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहतूक सुधारेल.
पाषाण (पंचवटी) ते कोथरूड आणि तळजाई चौक ते हिंगणे या दरम्यान दोन महत्त्वाचे बोगदे प्रस्तावित आहेत.
नदीकाठ आणि भुयारीमार्ग
नदीकाठ रस्ता : आरटीओ ते मुंढवा या दरम्यान ३० मीटर रुंदीचा रस्ता वाहतुकीसाठी मोठा दिलासा ठरेल.
पादचारी भुयारी मार्ग : नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी नवीन भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




