सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील दोडामार्ग येथील एसटी बस स्थानकातून एसटी बस पळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची आणि त्यातील सुमारे ४५ लिटर डिझेल चोरून नेल्याची धक्कादायक व तितकीच विचित्र घटना उघडकीस आली आहे. या घटनेत बसस्थानकाचे दगडी व चिरेबंदी कुंपण तोडून बस अर्धवट महामार्गाच्या दिशेने सरकलेली आढळून आली. ही एसटी बस रात्रीच्या वेळी स्थानकातून बाहेर कशी आली, कुंपण कसे तुटले आणि बसच्या टाकीतील डिझेल कोणी चोरले, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून दोडामार्गसह संपूर्ण कोकण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
रात्री मुक्कामाला उभी केलेली बस सकाळी महामार्गावर आढळली
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोल्हापूर-दोडामार्ग ही एसटी बस शुक्रवारी रात्री दोडामार्ग येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात मुक्कामासाठी उभी करण्यात आली होती. कर्तव्यावर असलेले बसचालक श्रीकांत पाटील आणि वाहक सागर मुदगी हे रात्रीचे जेवण आटोपून विश्रांतीसाठी बस स्थानकातील आवारात गेले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी चालक आणि वाहक कामासाठी आले असता, ही एसटी बस स्थानकाचे कुंपण तोडून अर्धवट मुख्य महामार्गावर आलेली त्यांना दिसून आली. बसचा अर्धा भाग बसस्थानकाच्या आवारात आणि उर्वरित अर्धा भाग मुख्य महामार्गावर होता.
४५ लिटर डिझेल चोरीला; नियोजित फेरीही रखडली
बसची पाहणी करण्यात आली असता या घटनेत बसचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले; तसेच बसच्या इंधनाच्या टाकीमधील सुमारे ४५ लिटर डिझेलही चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ही बस दररोज सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी दोडामार्ग बसस्थानकातून कोल्हापूरच्या दिशेने रवाना होते. मात्र, शनिवारी सकाळी घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे आणि बसच्या अडकून पडलेल्या अवस्थेमुळे तिची सकाळची नियोजित फेरी होऊ शकली नाही.
घटनेमागचे गूढ कायम; चर्चेला उधाण
प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असलेली बस सकाळी प्रवासाला निघण्याऐवजी कुंपण तोडून अर्धवट महामार्गावर कशी पोहोचली? बस कोणी पळवण्याचा प्रयत्न केला की अन्य कोणत्याही कारणाने ती सरकली? तसेच डिझेल चोरीचा प्रकार नेमका कधी घडला, याचा शोध घेतला जात आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या रहस्यमय आणि धक्कादायक प्रकारामुळे दोडामार्ग तालुक्यात दिवसभर चर्चांना उधाण आले होते.
शहर
- पुणे: 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून सोनिया गांधींना कायदेशीर नोटीस
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
महाराष्ट्र
- बीड: 'खून का बदला खून'! बिबट्याने पिलाला मारले, संतापलेल्या कुत्रीने थेट बिबट्याचा शावक संपवला!
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- कोल्हापूर: पहाटेच्या मोजणीवरून नाधवडे शिवारात रणकंदन; बोरवडे आणि उंदरवाडीत शेतकऱ्यांचा रस्त्यावर संताप!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



