सुखवीर सिंह यांचा कॉलम:जग अणुऊर्जेकडे वाटचाल करत आहे, आपण मागे राहू शकत नाही

अनेकदा एखादा अनुभव, घटना किंवा ऐकलेली गोष्ट‎आपल्या मानसात इतकी खोलवर रुजते की, आपण ती‎तथ्यांच्या कसौटीवर परखण्याऐवजी सत्य मानू लागतो.‎विमान प्रवास याचे एक छोटेसे उदाहरण आहे. रस्ते‎अपघातात कितीतरी पटीने जास्त लोकांचा मृत्यू होतो,‎तरीही अनेक लोकांना विमानात बसण्याची जास्त भीती‎वाटते. याचे कारण धोक्याची वास्तविक तीव्रता नसून,‎त्याप्रती असलेली आपली मानसिक प्रतिक्रिया आहे. अणू‎ऊर्जेच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. चेर्नोबिल‎आणि फुकुशिमासारख्या अपघातांनी सामूहिक स्मृतीवर‎खोल छाप सोडली आहे. परंतु ऊर्जेच्या भविष्याचा निर्णय‎आपल्या आशंकांवर नव्हे, तर वैज्ञानिक पुरावे, आर्थिक‎विवेक आणि पर्यावरणीय उत्तरदायित्वातून झाला पाहिजे.‎ अणू ऊर्जेबद्दल चिंता व्यक्त केली जाते. विकिरण,‎रेडिओधर्मी कचरा, प्रकल्पांची सुरक्षा, अपघाताच्या‎स्थितीतील व्यापक परिणाम या वास्तविक चिंता आहेत. परंतु‎अवर वर्ल्ड इन डेटाच्या संकलित अंदाजांनुसार, प्रति‎टेराव्हॉट-तास वीज निर्मितीवर होणारे अपघात, वायू‎प्रदूषणाशी संबंधित मृत्यूदर कोळशासाठी सुमारे 24.62,‎नैसर्गिक वायूसाठी 2.82, अणू ऊर्जेसाठी अवघा 0.03 आहे.‎म्हणजेच ऊर्जेच्या इतर प्रकारांच्या तुलनेत हा 800 व्या ते‎100 व्या भागापेक्षाही कमी आहे. हे अंदाज महत्त्वाचे तथ्य‎समोर आणतात : जीवाश्म इंधनांमुळे होणारे सामान्य वायू‎प्रदूषणसुद्धा मानवी आयुष्यासाठी गंभीर धोका आहे. होय,‎अणू ऊर्जासुद्धा धोक्यापासून पूर्णपणे मुक्त नाही, पण‎धोक्याचे मूल्यमापन प्रति युनिट ऊर्जेच्या एकूण प्रभावावरून‎झाले पाहिजे.ऊर्जेसंबंधीच्या चर्चेची दुसरी महत्त्वाची बाजू‎म्हणजे हवामान बदल. कोळशावर आधारित वीज निर्मितीत‎कार्बन डायऑक्साइडसोबतच सूक्ष्म कण, इतर प्रदूषकांचे‎उत्सर्जन होते. याउलट, अणू ऊर्जा प्रकल्प वीज तयार‎करताना कोळसा किंवा वायू यांसारख्या इंधनाचे दहन करत‎नाहीत. अणू ऊर्जेचे ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन खूप कमी‎राहते. पवन ऊर्जेचे उत्सर्जन याच नीचांकी पातळीच्या‎आसपास असते; म्हणूनच ॲटोमिक एनर्जीला क्लीन एनर्जी‎असेही म्हणतात. तथापि युरेनियम उत्खनन, रेडिओधर्मी‎कचरा आणि प्रकल्पांच्या जीवनचक्राचे पर्यावरणीय‎व्यवस्थापन करणेसुद्धा तितकेच आवश्यक आहे.अणू‎ऊर्जेच्या आर्थिक बाजूवर संतुलित दृष्टिकोन ठेवणेही‎गरजेचे आहे. हे खरे आहे की अणू ऊर्जा प्रकल्प‎उभारण्यासाठी लागणारा सुरुवातीचा भांडवली खर्च खूप‎जास्त असतो. इतर गुंतागुंतीसुद्धा विजेचा खर्च वाढवू‎शकतात. म्हणूनच नवीन अणू ऊर्जा प्रकल्पांची वीज प्रत्येक‎देशात सौर किंवा पवन ऊर्जेपेक्षा स्वस्त असेल, असा दावा‎केला जाऊ शकत नाही. परंतु सौर आणि पवन ऊर्जेच्या‎उत्पादन खर्चातही गेल्या काही वर्षांत लक्षणीय घट झाली‎आहे. अनेक ठिकाणी नवीन सौर प्रकल्प स्पर्धात्मक दरात‎वीज उपलब्ध करून देतात. परंतु सौर ऊर्जा रात्री उपलब्ध‎नसते आणि पवन ऊर्जेचे उत्पादन हवामानावर अवलंबून‎असते. आपल्याला 24 तास विजेची गरज असते. अणू‎ऊर्जा प्रकल्पांचा एक मुख्य फायदा म्हणजे त्यांची सतत‎उत्पादन करण्याची क्षमता होय. ते कमी जमिनीवर मोठ्या‎प्रमाणावर वीज उपलब्ध करून देऊ शकतात आणि उद्योग,‎शहरी भाग व स्थिर वीज पुरवठ्याची गरज असलेल्या‎यंत्रणांसाठी उपयुक्त आहेत. फ्रान्स, अमेरिका, रशिया,‎चीन, दक्षिण कोरिया आणि जपान यांसारख्या देशांनी‎वेगवेगळ्या स्तरांवर अणू ऊर्जेला आपल्या यंत्रणेचा भाग‎बनवले आहे. या देशांचे अनुभव सांगतात की अणू ऊर्जेचे‎यश केवळ तंत्रज्ञानावरच नाही, तर आर्थिक व्यवस्था,‎रेग्युलेशन कॅपॅबिलिटीज, सार्वजनिक विश्वास आणि‎दीर्घकालीन धोरणातील सातत्यावरही अवलंबून असते.‎ भारतासमोरील आव्हान मोठे आहे. वेगाने वाढणारी‎अर्थव्यवस्था, औद्योगिकीकरण, शहरीकरण, डिजिटल‎पायाभूत सुविधांना अधिक वीज हवी आहे. सरकारने 2047‎पर्यंत अणू ऊर्जा क्षमता 100 गिगावॉटपर्यंत पोहोचवण्याचे‎लक्ष्य निश्चित केले आहे. अर्थात लक्ष्य निश्चित करणे‎आणि ते साध्य करणे ही वेगवेगळी आव्हाने आहेत.‎यासोबतच, आपल्याला सौर-पवन ऊर्जा, ऊर्जा साठवणूक,‎विद्युत ग्रिड आणि ऊर्जा कार्यक्षमतेमध्येही गुंतवणूक करावी‎लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *