मकरंद परांजपे यांचा कॉलम:अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या ‎लोकांबद्दल द्वेष का वाढला आहे?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांना कदाचित गेल्या‎अर्ध्या शतकातील द्वेषाच्या सर्वात भीषण लाटेचा सामना‎करावा लागत आहे. वाढता अस्मितावादी कल‎असलेला समाजवादी डावा पंथ, संतापाने भरलेला, ‎भूतकाळातील गौरवगानात अडकलेला उजवा पंथ या‎दोघांत भारतीय वंशाचे अमेरिकन अस्वस्थ स्थितीत‎पाहत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक‎उपलब्धी त्यांना संशय, असूया, द्वेषाचे लक्ष्य बनवत‎ आहेत. 11 ऑक्टोबरला शिकागो जवळच्या ऑरोरामध्ये‎19 वर्षांच्या अलेक्झांड्रोस पापोराकिस नावाच्या एका‎युवकाने- जो स्वतःला ‘नियो-नाझी'' सांगतो- एका‎मंदिराबाहेर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. नशीब‎असे की त्याची रायफल जाम झाली. पोलिसांनी त्याला‎अटक केली. अशा प्रकारे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात‎पूजा-अर्चा करत असलेले शेकडो हिंदू नरसंहारापासून‎वाचले. त्या दिवशी मंदिरात पूजा करणाऱ्यांत डेमोक्रेटिक‎खासदार राजा कृष्णमूर्ती, त्यांचे कुटुंबही होते. दुसऱ्या‎बाजूला, ओहायोत रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गव्हर्नर‎पदाचे उमेदवार विवेक रामास्वामी निवडणूक हरले. याचे‎कारण त्यांच्या टीमने डेमोक्रेटिक प्रतिस्पर्धी एमी‎एक्टनबद्दल जारी केलेली अरुचिकर जाहिरात‎ असण्याव्यतिरिक्त हे असू शकते की हे मध्य-पश्चिम‎राज्य- जिथे गोरे बहुसंख्याक आहेत- कदाचित भारतीय‎वंशाच्या हिंदूला गव्हर्नर म्हणून स्वीकारण्यात सहज‎राहिले नसावे. रामास्वामींच्या विरोधात जनमत‎वळवण्यासाठी कारण पुरेसे ठरू शकत होते- मग ते‎त्यांचे शाकाहारी असणे असो, घरात अनवाणी चालणे‎असो. भारतवंशी अमेरिकेतील इमिग्रंट समुदायांपैकी‎एक आहेत. प्यू रिसर्च सेंटरनुसार, 2023 मध्ये भारतीय‎वंशाचे प्रमुख कुटुंबांचे वार्षिक सरासरी उत्पन्न 1,51,000‎डॉलरपेक्षा जास्त होते. त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक‎उपलब्धी तितक्याच प्रभावी आहेत. परंतु अमेरिकन‎समाजात भारतवंशीयांच्या योगदानाचा उत्सव साजरा‎करण्याऐवजी, ‘मागा''चे काही भाग त्यांना प्रतिस्पर्धी‎म्हणून पाहू लागले. त्यांना अशा घुसखोरांप्रमाणे पाहिले‎जात आहे, जे अमेरिकन गोऱ्यांच्या नोकऱ्या हिसकावून‎घेत आहेत. ‘मागा''च्या भारत-विरोधी मानसिकतेत‎ख्रिश्चन कट्टरतेसह वर्णद्वेषाचे घटकही आहेत. परंतु‎ यामागे राजकीय गणितही असू शकते. भारतवंशी‎पारंपरिकरीत्या डेमोक्रेटिक पार्टीकडे कल ठेवत आले .‎त्यामुळे ‘मागा''चे रणनीतीकार असा विचार करत‎असावेत की अशा समुदायाला आपल्या बाजूने‎करण्याचा प्रयत्न तरी का करावा, जो कसाही‎रिपब्लिकन्सना मतदान करणार नाही? जरी रामास्वामी‎उषा व्हेन्स याचा पुरावा आहेत की रिपब्लिकन गोटातही‎भारतवंशीयांची उपस्थिती वाढली. ट्रम्प प्रशासनाने‎नवीन एच1बी व्हिसावर अनेक अडथळे आणले आहेत.‎परंतु इमिग्रेशन व्यवस्थेत सुधारणा करणे ही एक गोष्ट‎आहे, इमिग्रंट्सना व्हिलनप्रमाणे सादर करणे दुसरी.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अमेरिका त्या शास्त्रज्ञांना, अभियंत्यांना, डॉक्टरांना,‎उद्योजकांना हतोत्साहित करून तांत्रिक श्रेष्ठता टिकवून‎ठेवू शकत नाही, जे ती टिकवण्यास मदत करतात. अशा‎स्थितीत भारतवंशीयांनी काय करायला हवे? उत्तर सरळ‎आहे : संघटित व्हा, सहभाग घ्या, प्रभाव निर्माण करा.‎दीर्घ काळापासून या समुदायाचे लक्ष शिक्षण,‎व्यावसायिक प्रगती, उद्योजकता,कौटुंबिक समृद्धीवर‎केंद्रित राहिले. राजकीय सक्रियतेची जबाबदारी त्यांनी‎इतरांवर सोडली. परंतु विशेषतः हिंदू अमेरिकनांनी‎धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण घटनात्मक संस्थांच्या‎माध्यमातून करायला हवे. सोबतच भारतवंशियांनी‎वांशिक सीमांच्या पलीकडे जाऊन भागीदारीही निर्माण‎करायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी ओळख‎त्यांच्या हातून परिभाषित होऊ देता कामा नये, जे त्यांचा‎द्वेष करतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ अमेरिकन समाजात भारतवंशीयांच्या‎योगदानाचा उत्सव साजरा करण्याऐवजी,‎‘मागा''चे काही भाग त्यांना प्रतिस्पर्धी‎म्हणून पाहू लागले. त्यांना अशा‎घुसखोरांप्रमाणे पाहिले जाते , जे‎गोऱ्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *