नीरज कौशल यांचा कॉलम:आपल्या कंबरघेराच्या वाढीमध्ये‎ पाश्चात्त्य संस्कृतीचा दोष नाही

‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतात लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढली आहे. 15 ते‎49 वयोगटातील दर तीन महिलांपैकी एक व दर चार‎पुरुषांपैकी एकापेक्षा जास्त जणांचे वजन प्रमाणापेक्षा‎जास्त आहे किंवा ते लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. सर्व‎समस्यांसाठी पश्चिमेला दोष देण्याच्या सवयीनुसार‎अनेक लोक यासाठीही जागतिकीकरण, फास्ट फूड व‎पाश्चात्य जीवनशैलीला जबाबदार धरतात. खरे तर‎आपल्या खाण्यापिण्यातच कंबरेचा घेर वाढवणारे भरपूर‎पदार्थ आधीपासून आहेत.‎ छोले-भटुऱ्यामध्ये अँगलस बर्गरपेक्षाही जास्त कॅलरीज‎असतात. छोले-भटुऱ्यांनंतर गरम जिलेबी खाणे तर‎आपल्याला खूप आवडते. पण कुरकुरीत व चवदार ‎‎असणारी जिलेबी म्हणजे साखरेच्या पाकाचा साठाच‎असते. दोन मध्यम आकाराच्या गुलाबजाममध्ये व्हॅनिला ‎‎चॉकलेट आईस्क्रीमच्या एका स्कूपपेक्षा दुप्पट कॅलरीज‎असू शकतात. शंभर ग्रॅम हलव्यात केकच्या एका ‎‎तुकड्यापेक्षा दुप्पट कॅलरीज असू शकतात.‎जागतिकीकरण आणि आपला वाढता लठ्ठपणा याच्यात ‎‎काही अप्रत्यक्ष संबंध असेल, तर तो एवढाच की ‎‎जागतिकीकरणामुळे देशात आर्थिक समृद्धी आली. या ‎‎समृद्धीने आपल्या ताटाचा आकार आणि अन्नाची‎समृद्धी दोन्ही वाढवली. उत्पन्न वाढल्यामुळे कुटुंबे जास्त‎अन्न विकत घेण्यास सक्षम झाली. पूर्वी कधीतरी‎सणासुदीला मिळणाऱ्या चैनीच्या गोष्टी आता रोजच्या‎आहारात आल्या. भारतात याचा अर्थ सहसा मसालेदार‎अन्नाची वाढती मेजवानी, गोडधोड पदार्थ, तळलेले‎पदार्थ आणि जास्त कॅलरीज असलेले अन्न असा होतो.‎ पण समोसा, भजी, पुऱ्या, भटुरे, जिलेबी आणि‎गुलाबजाम यामध्ये पाश्चात्य असे काहीच नाही. भात‎आणि गव्हाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वाढणे ही भारतीय‎खाद्यान्नाचीच खासियत आहे. यातील कोणताही पदार्थ‎मर्यादित प्रमाणात खाल्ला तर तो वाईट नाही. वाढत्या‎यांत्रिकीकरणामुळे शारीरिक कष्टाची गरज कमी झाली‎आहे. त्यामुळे शरीराकडून खर्च होणाऱ्या कॅलरीज‎घटल्या. चालणे किंवा सायकलीचा वापर करण्याऐवजी‎वाहनांवर अवलंबित्व वाढले . शेतीतील तंत्रज्ञानामुळे‎शारीरिक श्रम कमी झाले. सेवा क्षेत्राचा विस्तार आणि‎ऑफिसमधील बसून करायच्या कामांमुळे लोक‎शारीरिकदृष्ट्या निष्क्रीय जीवनशैलीकडे ढकलले गेले‎आहेत. घरातील उपकरणांनीही रोजच्या कामांमधील‎शारीरिक मेहनत कमी केली आहे. याचा परिणाम म्हणजे‎जास्त कॅलरीजचे सेवन आणि ऊर्जेचा कमी वापर!‎ काही दशकांपूर्वीपर्यंत भारतात लठ्ठपणा ही संकल्पनाच‎अस्तित्वात नव्हती. एखाद्या मित्राचे किंवा नातेवाईकाचे‎वजन थोडे वाढले तर लोक कौतुकाने म्हणायचे,‎आजकाल मस्त हेल्दी दिसतोयस!’ पण कोणाचे वजन‎घटले, तर आपण काळजीने विचारायचो, //"काय‎झाले? खूप बारीक/कमकुवत दिसतोयस!’ शेवटी, या‎म्हणी आणि भावना पोटभर अन्न मिळणे हे भाग्याचे‎लक्षण मानले जायचे अशा काळात तयार झाल्या होत्या.‎ खरे संकट हे आहे की, भारतीयांच्या जीवनशैलीत‎पिढ्यानपिढ्या मोठे बदल झाले. पण खाण्याच्या सवयी‎मात्र त्या बदलांशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत.‎‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा''ची आकडेवारी सांगते‎की, गरीब राज्यांच्या तुलनेत श्रीमंत राज्यांत वजन‎वाढण्याची समस्या जास्त आहे. राज्यांच्या आताही‎संपन्न कुटुंबांमध्ये वजन वाढण्याची किंवा लठ्ठपणाची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎शक्यता जास्त आढळते. अनेक पाश्चात्य देशांत‎लठ्ठपणाची समस्या गरीब लोकसंख्येमध्ये जास्त दिसते.‎भारतात ऐतिहासिकदृष्ट्या लठ्ठपणाचा फटका श्रीमंत‎वर्गालाच जास्त बसला. अर्थात, आता ही समस्या सर्वच‎उत्पन्न गटांमध्ये वेगाने पसरत आहे. लठ्ठपणाच्या या‎साथीवर उपाय नक्कीच आहे. पण त्यासाठी आपली‎जीवनशैली व आहार या दोन्हीमध्ये बदल करावे‎लागतील. पाश्चात्य देशांत लठ्ठपणा नियंत्रणात‎आणण्यासाठी लोक आहारातील बदल व‎व्यायामासोबतच औषधांचा आधारही वेगाने घेत आहेत.‎भारतालाही असाच मार्ग स्वीकारण्याची गरज आहे.‎जागतिकीकरणाला दोष देणे सोपे असू शकते, पण त्याने‎आपले वजन नक्कीच कमी होणार नाही.‎ (लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे. )‎ अनेक जण वाढत्या लठ्ठपणाच्या‎समस्येसाठी जागतिकीकरण, फास्ट फूड‎व पाश्चात्त्य जीवनशैलीला जबाबदार‎धरतात. पण कंबरेचा घेर वाढवणारे‎पुरेसे अन्नपदार्थ आधीच भारतात आहेत.‎यासाठी आपल्याला जागतिकीकरणाची‎अजिबात गरज नाही.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *