भारतात लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढली आहे. 15 ते49 वयोगटातील दर तीन महिलांपैकी एक व दर चारपुरुषांपैकी एकापेक्षा जास्त जणांचे वजन प्रमाणापेक्षाजास्त आहे किंवा ते लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. सर्वसमस्यांसाठी पश्चिमेला दोष देण्याच्या सवयीनुसारअनेक लोक यासाठीही जागतिकीकरण, फास्ट फूड वपाश्चात्य जीवनशैलीला जबाबदार धरतात. खरे तरआपल्या खाण्यापिण्यातच कंबरेचा घेर वाढवणारे भरपूरपदार्थ आधीपासून आहेत. छोले-भटुऱ्यामध्ये अँगलस बर्गरपेक्षाही जास्त कॅलरीजअसतात. छोले-भटुऱ्यांनंतर गरम जिलेबी खाणे तरआपल्याला खूप आवडते. पण कुरकुरीत व चवदार असणारी जिलेबी म्हणजे साखरेच्या पाकाचा साठाचअसते. दोन मध्यम आकाराच्या गुलाबजाममध्ये व्हॅनिला चॉकलेट आईस्क्रीमच्या एका स्कूपपेक्षा दुप्पट कॅलरीजअसू शकतात. शंभर ग्रॅम हलव्यात केकच्या एका तुकड्यापेक्षा दुप्पट कॅलरीज असू शकतात.जागतिकीकरण आणि आपला वाढता लठ्ठपणा याच्यात काही अप्रत्यक्ष संबंध असेल, तर तो एवढाच की जागतिकीकरणामुळे देशात आर्थिक समृद्धी आली. या समृद्धीने आपल्या ताटाचा आकार आणि अन्नाचीसमृद्धी दोन्ही वाढवली. उत्पन्न वाढल्यामुळे कुटुंबे जास्तअन्न विकत घेण्यास सक्षम झाली. पूर्वी कधीतरीसणासुदीला मिळणाऱ्या चैनीच्या गोष्टी आता रोजच्याआहारात आल्या. भारतात याचा अर्थ सहसा मसालेदारअन्नाची वाढती मेजवानी, गोडधोड पदार्थ, तळलेलेपदार्थ आणि जास्त कॅलरीज असलेले अन्न असा होतो. पण समोसा, भजी, पुऱ्या, भटुरे, जिलेबी आणिगुलाबजाम यामध्ये पाश्चात्य असे काहीच नाही. भातआणि गव्हाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वाढणे ही भारतीयखाद्यान्नाचीच खासियत आहे. यातील कोणताही पदार्थमर्यादित प्रमाणात खाल्ला तर तो वाईट नाही. वाढत्यायांत्रिकीकरणामुळे शारीरिक कष्टाची गरज कमी झालीआहे. त्यामुळे शरीराकडून खर्च होणाऱ्या कॅलरीजघटल्या. चालणे किंवा सायकलीचा वापर करण्याऐवजीवाहनांवर अवलंबित्व वाढले . शेतीतील तंत्रज्ञानामुळेशारीरिक श्रम कमी झाले. सेवा क्षेत्राचा विस्तार आणिऑफिसमधील बसून करायच्या कामांमुळे लोकशारीरिकदृष्ट्या निष्क्रीय जीवनशैलीकडे ढकलले गेलेआहेत. घरातील उपकरणांनीही रोजच्या कामांमधीलशारीरिक मेहनत कमी केली आहे. याचा परिणाम म्हणजेजास्त कॅलरीजचे सेवन आणि ऊर्जेचा कमी वापर! काही दशकांपूर्वीपर्यंत भारतात लठ्ठपणा ही संकल्पनाचअस्तित्वात नव्हती. एखाद्या मित्राचे किंवा नातेवाईकाचेवजन थोडे वाढले तर लोक कौतुकाने म्हणायचे,आजकाल मस्त हेल्दी दिसतोयस!’ पण कोणाचे वजनघटले, तर आपण काळजीने विचारायचो, //"कायझाले? खूप बारीक/कमकुवत दिसतोयस!’ शेवटी, याम्हणी आणि भावना पोटभर अन्न मिळणे हे भाग्याचेलक्षण मानले जायचे अशा काळात तयार झाल्या होत्या. खरे संकट हे आहे की, भारतीयांच्या जीवनशैलीतपिढ्यानपिढ्या मोठे बदल झाले. पण खाण्याच्या सवयीमात्र त्या बदलांशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत.‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा''ची आकडेवारी सांगतेकी, गरीब राज्यांच्या तुलनेत श्रीमंत राज्यांत वजनवाढण्याची समस्या जास्त आहे. राज्यांच्या आताहीसंपन्न कुटुंबांमध्ये वजन वाढण्याची किंवा लठ्ठपणाचीशक्यता जास्त आढळते. अनेक पाश्चात्य देशांतलठ्ठपणाची समस्या गरीब लोकसंख्येमध्ये जास्त दिसते.भारतात ऐतिहासिकदृष्ट्या लठ्ठपणाचा फटका श्रीमंतवर्गालाच जास्त बसला. अर्थात, आता ही समस्या सर्वचउत्पन्न गटांमध्ये वेगाने पसरत आहे. लठ्ठपणाच्या यासाथीवर उपाय नक्कीच आहे. पण त्यासाठी आपलीजीवनशैली व आहार या दोन्हीमध्ये बदल करावेलागतील. पाश्चात्य देशांत लठ्ठपणा नियंत्रणातआणण्यासाठी लोक आहारातील बदल वव्यायामासोबतच औषधांचा आधारही वेगाने घेत आहेत.भारतालाही असाच मार्ग स्वीकारण्याची गरज आहे.जागतिकीकरणाला दोष देणे सोपे असू शकते, पण त्यानेआपले वजन नक्कीच कमी होणार नाही. (लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे. ) अनेक जण वाढत्या लठ्ठपणाच्यासमस्येसाठी जागतिकीकरण, फास्ट फूडव पाश्चात्त्य जीवनशैलीला जबाबदारधरतात. पण कंबरेचा घेर वाढवणारेपुरेसे अन्नपदार्थ आधीच भारतात आहेत.यासाठी आपल्याला जागतिकीकरणाचीअजिबात गरज नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



