अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!

अमरावती: स्थानिक मुख्य मार्गावरील जगदंब चौकात दोन अज्ञातांनी अडत्याला ५० रुपयांची नोट खाली पडल्याचे सांगितले. ती नोट घेण्यासाठी वाकताच त्यांच्याकडील पाच लाखांची बॅग लंपास करण्यात आली. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. तथा अंजनगाव अकोला आणि बैतूल मार्गावर दोन पथके रवाना केली. संपूर्ण शहरातही आरोपींचा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण, वृत्त लिहिस्तोवर आरोपींचा शोध लागलेला नव्हता.

घटनेने परिसरात खळबळ
गुरुवार हा परतवाड्यातील आठवडी बाजाराचा दिवस. याकरिताच व्यापारी व अढते श्याम मालू यांनी विजय धर्माळे नामक कर्मचाऱ्याच्या मदतीने स्टेट बँकेमधून पाच लाखाची रक्कम काढली. धर्माळे हे दुचाकीने पैसे घेऊन जात असताना मागून दोन भामट्यांनी त्यांचा पाठलाग केला. नोट पडल्याची बतावणी करीत जगदंब चौकात थांबविले. ती नोट उचलण्याकरिता ते वाकताच पाच लाख रुपये असलेली पिशवी त्या चोरट्यांनी लंपास केली आणि काळ्या रंगाच्या दुचाकीने पसार झाले. या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *