बॉलिवूड किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी एखादी महागडी गाडी विकत घेतली, की चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा हमखास होते. परंतु यावेळी एका मराठी दिग्दर्शकाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. कारण या दिग्दर्शकाने एकाच दिवशी चार महागड्या आणि आलिशान गाड्या विकत घेतल्या आहेत. शिवजयंतीच्या मुहूर्तावर या दिग्दर्शकाने त्याच्या कलेक्शनमध्ये चार मोठ्या ब्रँडच्या गाड्यांचा समावेश केला आहे. या दिग्दर्शकाचं नाव आहे संतोष डावखर. ‘गोंधळ’ या चित्रपटातून संतोष यांना चांगलंच यश मिळालं असून, त्याच यशामुळे एकाच दिवशी चार महागड्या गाड्या विकत घेतल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची ओटीटी प्लॅटफॉर्मशी तगडी डील झाली असावी, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या सोशल मीडियावर संतोष डावखर यांचे या आलिशान गाड्यांसोबतचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या गाड्यांमध्ये रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू आणि बीव्हायडी सिलायन यांचा समावेश आहे. या चारच्या चार गाड्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. परंतु त्यांच्या एकूण खरेदी किंमतीचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक मांडणीचा अप्रतिम संगम राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या चित्रपटात दिसून येतो. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी अनपेक्षित आणि रहस्यमय वळण घेऊन येते. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.
मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. गोव्यात झालेल्या भारतीय सरकारच्या 56व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)मध्ये ‘गोंधळ’ने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या 56 वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय अधिकच ऐतिहासिक ठरला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




