आसनगाव आणि कसारा दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका कार्यान्वित करणे तसेच कसारा यार्डमधील 'अप' यार्ड मार्गिकेच्या विस्तारीकरणाच्या महत्त्वाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान तब्बल १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळे मुंबई उपनगरीय लोकल सेवेसह अनेक लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. कसारा-कल्याण तिसऱ्या आणि चौथ्या मार्ग प्रकल्पाचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जात असून, या प्रकल्पामुळे भविष्यात उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस वाहतूक पूर्णपणे स्वतंत्र होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यातील ब्लॉक आणि लोकल सेवेवरील परिणाम (७ ते ९ ऑक्टोबर)
या १२ दिवसांच्या विशेष ब्लॉकच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे:
-
आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद: ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ या वेळेत आसनगाव ते कसारा दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
-
शॉर्ट टर्मिनेशन्स आणि ओरिजिनेशन: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरून सुटणाऱ्या काही लोकल गाड्यांचा प्रवास आसनगाव स्थानकावरच थांबवण्यात येईल. तसेच काही गाड्या कसाऱ्याऐवजी आसनगावहूनच मुंबईच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत.
-
रद्द करण्यात आलेल्या रात्रीच्या लोकल फेऱ्या: ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी घेतलेल्या ब्लॉकमुळे खालीलप्रमाणे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत:
-
८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.४७ वाजता सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल.
-
९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०८ वाजता सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल.
-
८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.१४ वाजता टिटवाळ्याहून सुटणारी टिटवाळा-ठाणे लोकल.
-
९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.५१ वाजता कसाऱ्याहून सुटणारी कसारा-सीएसएमटी लोकल.
-
-
शेवटच्या आणि पहिल्या लोकल वेळा: ८ ऑक्टोबर रोजी ब्लॉकपूर्वी कसारासाठी शेवटची लोकल रात्री ९.३२ वाजता सीएसएमटीहून सुटेल, तर कसाऱ्याहून रात्री १० वाजता सुटणारी लोकल सीएसएमटीसाठी रवाना होईल. ब्लॉक संपल्यानंतर पहिल्या लोकल अनुक्रमे पहाटे ४.१९ आणि ४.५९ वाजता धावतील.
लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
ब्लॉकच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाकडून अनेक महत्त्वाच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत किंवा त्या पुनर्निर्धारित (Reschedule) करण्यात आल्या आहेत:
-
एलटीटी-बनारस एक्सप्रेस (१२१६७): ८ ऑक्टोबर रोजी सुटणारी ही गाडी आता ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (LTT) सुटेल.
-
एलटीटी-पाटणा एक्सप्रेस (१२१४१): ८ ऑक्टोबर रोजीची ही गाडी ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.१५ वाजता LTT वरून रवाना होईल.
-
सीएसएमटी-अमृतसर एक्सप्रेस (१११०५७): ८ ऑक्टोबर रोजी रात्री सुटणारी ही गाडी ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.०० वाजता CSMT वरून सोडण्यात आएगी.
-
सीएसएमटी-बनारस महानगरी एक्सप्रेस (२२१७७): ९ ऑक्टोबर रोजी ही गाडी पहाटे ४.१५ वाजता CSMT वरून सुटेल.
-
एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस (२२५३८): ९ ऑक्टोबर रोजी ही गाडी पहाटे ४.३० वाजता सोडण्यात येईल.
गाड्यांचे नियमन (Regulation)
या ब्लॉकदरम्यान सुरळीत कामे पार पाडण्यासाठी इगतपुरी, खर्डी आणि आटगाव रेल्वे स्थानकांवर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या नियंत्रित (Regulation) केल्या जाणार आहेत. गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस, गोमती नगर-सीएसएमटी पुष्पकम एक्सप्रेस, अयोध्या कॅन्ट-एलटीटी एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांना विविध स्थानकांवर काही वेळ थांबवले जाईल. तसेच भुसावळ विभागातून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवरही ३० मिनिटे ते सव्वा तासापर्यंत नियंत्रण असणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे कि, या पायाभूत सुविधांच्या विकासकामामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, तरी प्रवाशांनी आपले नियोजन करूनच प्रवास करावा. तिसरी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर कसारा मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.
शहर
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
महाराष्ट्र
- पुणे: आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय! घरकुलांसाठी ८६३ भूमिहीनांना मिळाली जागा, १४ हजारांवर जणांना आधारकार्डचे वितरण; जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!

























Subscribe to my channel




