अहिल्यानगर: कर्जत तालुक्यातील जलालपूर गावातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नीट (NEET) परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे तीव्र नैराश्यात गेलेल्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंकिता सुरेश सांगळे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुण विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे कर्जत तालुका आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत अंकिता सांगळे हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी ती गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET Exam) अत्यंत कष्टाने तयारी करत होती. देशात गाजलेल्या नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे व परीक्षा रद्द झाल्यामुळे तिला पुन्हा एकदा नव्याने परीक्षा द्यावी लागली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या या री-टेस्टच्या निकालामध्ये अंकिताला १६६ गुण मिळाले होते. श्रेणीच्या कटऑफपेक्षा गुण कमी पडल्याने आणि अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात होती. तिचे शिक्षक आणि कुटुंबीय तिला "नीट ही काही आयुष्यातील एकमेव परीक्षा नाही," असे सांगून सातत्याने धीर देत होते, परंतु नैराश्यातून ती बाहेर येऊ शकली नाही.
ही दुर्दैवी घटना शनिवारी घडली, ज्या दिवशी अंकिताचे वडील आणि भाऊ धार्मिक कामासाठी पंढरपूरला गेले होते, तर तिची आई घरकामामध्ये व्यस्त होती. अभ्यासासाठी अंकिताकडे घरातील एक स्वतंत्र खोली होती. बऱ्याच वेळेपर्यंत तिच्या खोलीतून कोणतीही हालचाल दिसून आली नाही, तेव्हा दुपारी साडेचारच्या सुमारास तिच्या आईने खोलीचा दरवाजा उघडून पाहिले, त्यावेळी ती गळफास घेतलेल्या लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. आईने केलेल्या हंबरड्यानंतर शेजाऱ्यांनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट (आत्महत्याची चिठ्ठी) देखील सापडली आहे, ज्यामध्ये नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यामुळे व डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने नमूद केले आहे. मयत अंकिताचे वडील हे मिनी बस चालकाचे काम करतात तर आई घरीच शिवणकाम करून संसाराला हातभार लावते. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलीच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही आणि तिच्या स्वप्नांसाठी ते नेहमी खंबीरपणे पाठीशी उभे होते. मात्र, होतकरू लेकीच्या या अचानक जाण्याने तिच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




