तुम्ही भाजपचे समर्थक आहात की काँग्रेसचे यावरूनकाहीच फरक पडत नाही. परंतु मतदार याद्यांच्यादुरुस्तीची प्रक्रिया ‘एसआयआर''च्या रूपाने राबवलीगेली. त्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत. एकभारतीय म्हणून आपण नेहमीच आपल्या शेजारीलदेशांमधील राजकीय अस्थिरता पाहत आलो आहोत.पाकिस्तानातील लष्करशाही, बांगलादेशातील हिंसकगोंधळ, नेपाळ व श्रीलंकेतील राजकीय उलथापालथ वम्यानमारमधील लष्करी बंड. हे सगळे पाहून आपल्यामजबूत लोकशाहीचा स्वाभाविक अभिमान वाटायचाआणि मोठा दिलासाही मिळायचा. आपल्याकडे एकानिवडणुकीकडून दुसऱ्या निवडणुकीकडे सत्ताहस्तांतरणाची प्रक्रिया नेहमीच शांततेत पार पडली आहे. परंतु, आपल्या लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीच्या जनादेशावर वाद होत आहेत. त्याला आव्हान दिले जात आहे. त्यावर प्रश्न उपस्थित केलेजात आहेत. राजकीय पक्षपाताचा आरोप झालेले ज्ञानेश कुमार हे काही पहिले मुख्य निवडणूक आयुक्त नाहीत,हे मान्य आहे. काँग्रेसच्या काळातही नवीन चावला यांच्यावर असे आरोप झाले होते. एम.एस. गिल तर निवडणूक आयोगातील जबाबदारी संपल्यानंतर युपीए सरकारमध्ये मंत्रीही झाले. परंतु आजकाल घडत आहे, त्याची पातळी पूर्णपणे वेगळी आहे. अलीकडच्या वर्षांतनिवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत होणारे वादप्रामुख्याने आचारसंहितेचे पालन झाले की नाही, किंवाआयोगाचा एखादा अधिकारी एखाद्या नेत्याच्या प्रक्षोभकभाषणावर किंवा हेलिकॉप्टर उतरवण्याच्या मुद्द्यावरगरजेपेक्षा जास्त मवाळ अथवा कडक राहिला,याभोवतीच फिरत राहिले. परंतु निवडणुकीशीजोडलेल्या एखाद्या वादामुळे थेट संविधानाने दिलेल्यामतदानाच्या हक्कावरच गदा येण्याची ही पहिलीच वेळआहे. निवडणूक आयोगाचे काम व खरे कर्तव्य तर हेचआहे परंतु, ‘एसआयआर''च्या स्वतःच्या व्याख्येनुसारआयोगाने भावनेलाच हरताळ फासला. नागरिकांवरचस्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्याची जबाबदारी टाकूनदिली. ‘एसआयआर''चा उद्देश भारतात बेकायदाराहणाऱ्या लोकांना मतदार यादीतून बाहेर काढणे हाअसेल, तर याचे पुरावे गोळा करण्याची जबाबदारीनक्कीच सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची असायला हवी.मग अचानक सामान्य नागरिकांनाच स्वतःचे नागरिकत्वसिद्ध करायला का सांगितले गेले-तेही इतक्यागुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे? ने. हमीप्रमाणेच, मोठा फटकागरीब, बेघर आणि समाजाच्या तळागाळातील लोकांनाबसला. शहरांबाहेर प्रवास करणाऱ्या कोणत्याहीव्यक्तीला हे माहीत असते की, तुम्ही एखाद्यावयोवृद्धाला त्याचे वय विचारले, तर बऱ्याचदा त्यांनाहीते नीट सांगता येत नाही. त्यांच्याकडे जन्माच्यादाखल्यासारखे कागदपत्र जतन करून ठेवलेले नसते.अशा वेळी ‘एसआयआर''बाबतच्या वादाच्या केंद्रस्थानीहाच मुख्य प्रश्न आहे की, नागरिकत्व सिद्ध करण्याचाभार शेवटी कोणावर असावा? ‘एसआयआर''प्रक्रियेच्या समर्थकांनी विरोधी पक्षाचा दावा खोडूनकाढण्यासाठी निवडणूक आयोगाच्याच आकडेवारीचादाखला दिला. देशभरातून 13 कोटींहून अधिकमतदारांची नावे यादीतून वगळल्याचा आरोपविरोधकांनी केला होता. यावर भाजपने नुकतेच स्पष्टकेले की, यापैकी 2.8 कोटी नावे मृत व्यक्तींची होती. 6.3कोटी लोक दुसरीकडे राहायला गेले होते; 1 कोटी नावे हीदुबार नोंदणीची होती. 3 कोटी लोकांचा काहीच पत्तालागला नाही. मतदार यादीत आपले नाव टिकवूनठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला, अशी व्यक्तीआपल्या आसपास नक्कीच आढळते. दिल्लीत तरनजीकच्या भविष्यात निवडणूक होणार नाही. तरी तेथीलमतदारांची संख्या 1.45 कोटींवरून घटून मसुदा यादीत97.53 लाखांवर आली. सुमारे 33 लाख मतदारांनानिवडणूक आयोगाने ‘तार्किक विसंगती'' असे कारणसांगून नोटीस पाठवल्या. यावर सर्वोच्च न्यायालयानेहीप्रश्न उपस्थित केला की, या नोटिसा काय मशीनद्वारेतयार केल्या गेल्या होत्या? निवडणूक आयोगाच्या याकारवाईविरोधात 22 लाख अर्ज/अपिले दाखल झाल्याचेसमजते. आतापर्यंत केवळ 1 लाख अर्जांचा निपटाराझाला आहे. पैकी 93 टक्के प्रकरणांत संबंधित नागरिकवैध मतदार असल्याचे आढळले. येईल? मतदान हाएक घटनात्मक हक्क आहे. कोणतीही विशेष सवलतनाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) निवडणूक आयोगाचे मुख्य काम आणिखरे कर्तव्य म्हणजे जास्तीत जास्तलोकांना निवडणुकीत सहभागीहोण्यासाठी प्रोत्साहित करणे हेच आहे. यासंपूर्ण प्रक्रियेचा मूळ उद्देश सर्वसमावेशकअसावा लागतो. यावरच प्रश्न उपस्थितहोत असल्यास ही शुभचिन्हे नाहीत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!

























Subscribe to my channel




