ठाणे / मुंबई: प्रसूतीनंतर उद्भवलेल्या अनेक गंभीर आणि गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्यांशी तब्बल ५० दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या नाझिया (वय ३५) या प्रसूत मातेला ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वी उपचारांनंतर नवजीवन दिले आहे. ४ जुलै रोजी तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी (सिझरियन) रुग्णालयात दाखल झालेल्या नाझिया यांना प्रसूतीनंतर घरी सोडण्यात आले होते; मात्र अवघ्या काही दिवसांतच त्यांची प्रकृती अत्यंत खालावली.
एकाच वेळी अनेक गंभीर आजारांचे आव्हान: नाझिया यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांच्या प्रसूतीच्या जखमेमध्ये गंभीर संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच त्यांना खालील अत्यंत जटिल समस्यांचा एकाच वेळी सामना करावा लागत होता:
-
अनियंत्रित मधुमेह (Uncontrolled Diabetes)
-
डेंग्यूचा संसर्ग (Dengue)
-
औषधांना दाद न देणारा घातक एमआरएसए (MRSA) संसर्ग
-
थायरॉईडचा तीव्र त्रास
-
फुफ्फुसात पाणी साचणे (Pleural Effusion)
वैद्यकीय पथकाचे प्रयत्न आणि आधुनिक 'व्हॅक्यूम ड्रेसिंग': स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जे. बी. सेनापती, युनिट प्रमुख डॉ. सुनिता उबाळे, डॉ. प्रिती नायकोडे, डॉ. प्राजक्ता मोरे आणि डॉ. एकता प्रसाद यांच्या पथकाने तातडीने विशेष उपचार सुरू केले. संसर्ग झालेल्या जखमेला लवकर भरण्यासाठी डॉक्टरांनी आधुनिक 'व्हॅक्यूम ड्रेसिंग' (Vacuum-assisted closure) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करून जखम शिवण्यात आली.
दीर्घकाळ उपचार चालल्यामुळे खचलेल्या रुग्णाचे वैद्यकीय पथकाने सातत्याने समुपदेशनही केले. अखेर ५० दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या असून त्यांना रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णाच्या नातेवाइकांनी आणि स्वतः मातेने अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम व संपूर्ण वैद्यकीय पथकाचे मनापासून आभार मानले आहेत.
शहर
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- पुणे: सावरकरांच्या नावाने राजकारण नको; न्यायालयातील प्रश्नांना पुराव्यांनी उत्तरे द्या, राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: सर्व पक्षांतील नेत्यांशी आतून दोस्ती; जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचे गुपित खासदार नीलेश लंकेंनी उलगडले
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- पुणे: उदय सामंत काय, हे महाराष्ट्राला ठाऊक; सुषमा अंधारेंच्या टीकेला सामंतांचे परखड उत्तर
- यवतमाळ: बाबूजींच्या २९व्या स्मृतीदिनानिमित्त सुरांची स्वरांजली आणि मान्यवरांची उपस्थिती अमित कुमार व बोमन इराणी येणार यवतमाळमध्ये!
गुन्हा
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा

























Subscribe to my channel




