पुणे: हडपसर ते घोरपडी दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कार्यान्वयनासाठी आणि पुणे तसेच हडपसर रेल्वे यार्डातील पायाभूत सुविधांना अंतिम स्वरूप देण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान १५ दिवसांचा विशेष रेल्वे ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत प्री-नॉन इंटरलॉकिंग (Pre-NI) आणि नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामांसोबतच अभियांत्रिकी, सिग्नल, दूरसंचार (S&T) आणि ओव्हरहेड उपकरणांच्या जोडणीची कामे केली जाणार आहेत.
गाड्यांच्या वेळापत्रकावर झालेला परिणाम: या १५ दिवसांच्या ब्लॉकमुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या, येणाऱ्या तसेच पुण्यामार्गे मुंबई, सोलापूर आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे:
-
रद्द करण्यात आलेल्या गाड्या: पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (१९ ते २३ सप्टेंबर व ३, ४ ऑक्टोबर) आणि सोलापूर-सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेस (३ व ४ ऑक्टोबर) पूर्णपणे रद्द राहतील. सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ४ ऑक्टोबरला रद्द राहील.
-
वळवण्यात आलेले मार्ग (Diverted Trains): मुंबई-चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस १९ ते २३ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानक टाळून कल्याण-इगतपुरी-मनमाड-दौंड मार्गाने धावेल. नागरकोईल-एलटीटी एक्स्प्रेस सोलापूर-कुर्डुवाडी-दौंड-अहिल्यानगर-मनमाड मार्गाने वळवण्यात आली आहे.
-
अंशतः रद्द व स्थानक बदल: काझीपेठ-हडपसर एक्स्प्रेस हडपसरऐवजी दौंड किंवा कुर्डुवाडी स्थानकापर्यंतच चालवली जाईल आणि तिथूनच माघारी सुटेल. बंगळुरू-सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस ३ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथेच थांबवण्यात येईल.
-
वेळेत बदल व नियमन: पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५० ऐवजी ६.२० वाजता सुटेल. इतरही काही गाड्या २० मिनिटे ते २ तासांपर्यंत विलंबाने किंवा थांबवून (Regulated) चालवल्या जातील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, स्थानकावर पोहोचण्यापूर्वी अधिकृत 'NTES' ॲप किंवा रेल्वे संकेतस्थळावरून आपल्या गाडीचे अद्ययावत स्टेटस तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.
शहर
- मुंबई: महाराष्ट्र हवामान अंदाज राज्यात पावसाचा जोर वाढणार! विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा, १३ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी!
- नाशिक: गणपती विसर्जनावेळी मोठा अनर्थ; सटाण्यात खासगी क्लासच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू, गावात शोककळा!
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
महाराष्ट्र
- मुंबई: महाराष्ट्र हवामान अंदाज राज्यात पावसाचा जोर वाढणार! विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा, १३ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी!
- नाशिक: गणपती विसर्जनावेळी मोठा अनर्थ; सटाण्यात खासगी क्लासच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू, गावात शोककळा!
- गोवा: गणेशोत्सवाला 'ओमकार' हत्तीच्या त्रासाचे ग्रहण; गणपतीची आरती करायची की पिके वाचवायची? शेतकरी आक्रमक
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!



























Subscribe to my channel




