सर्व देवता मधील प्रथम पूजनीय श्री गणेश देवाच्या सोबत " बाप्पा " हा शब्द अर्थात विशेषण हे पितृस्थानी व पितामह, वडील, सर्व भक्त जीवांचा तारक या अर्थाने, नात्याने जोडले गेले. संस्कृतमधील 'पितामह' किंवा 'बाप' (वडील) या शब्दांवरून आणि प्राकृत बोली लोकभाषेच्या प्रवाहातून गणपतीसोबत 'बाप्पा' हा आदरयुक्त आणि आपुलकीचा शब्द जोडला गेला. श्री गणेशाचा जयघोष करताना " गणपती बाप्पा मोरया " असेही आपण म्हणतो. हे मोरया विशेषण कशामुळे? याचेच विश्लेषण या लेखामध्ये आहे. श्री गणपतीसोबत जोडला गेलेला 'मोरया' हा शब्द १४ व्या शतकातील थोर गणेशभक्त श्री मोरया गोसावी यांच्या नावावरून आला असून तो नंतर 'गणपती बाप्पा मोरया' या जयघोषात समाविष्ट झाला. मंगलमूर्ती मोरया! अशा जयघोषांनी प्रत्येक घराघरात निनादतो. चिंचवड पुण्याचे गणेश भक्त श्री मोरया गोसावी आणि त्यांची भक्ती : ‘मोरया’ या शब्दाचा संबंध थेट त्यांच्याशी आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, १४ व्या शतकात (सुमारे १३७५ च्या सुमारास) मोरया गोसावी यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील वामन भट आणि पार्वतीबाई हे देखील गणपतीचे अनन्य भक्त होते. असे मानले जाते की, त्यांच्या कठोर तपश्चर्येवर आणि भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान गणेशाने त्यांच्या पोटी जन्म घेण्याचे वरदान दिले होते. मोरया गोसावी हे लहानपणापासूनच गणपतीच्या भक्तीत तल्लीन असायचे. ते दरमहा गणेश चतुर्थीच्या दिवशी चिंचवडहून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी तब्बल ९५ किलोमीटर अंतर अनवाणी पायांनी चालत जात असत. मयुरेश्वर भगवान हे मोरावर आरूढ असणारे गणेशाचे रूप मानले जाते. मयुरेश्वराचा दृष्टांत आणि तलावातील स्वयंभू मूर्ती : मोरया गोसावी यांनी ही खडतर वारी सलग ११७ वर्षे अखंडपणे चालू ठेवली. जसजसे त्यांचे वय वाढत गेले, तसतसे शरीर थकले आणि ९५ किलोमीटरची पायपीट करणे त्यांना अशक्य होऊ लागले. आपल्या लाडक्या भक्ताचे हे कष्ट पाहून भगवान मयुरेश्वर प्रसन्न झाले. एके रात्री भगवान गणेशाने मोरया गोसावी यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, “हे भक्ता ! आता तुला मोरगावला येण्याची गरज नाही. उद्या सकाळी जेव्हा तू चिंचवडच्या पवना नदीत/तलावात स्नान करून बाहेर येशील, तेव्हा मी स्वतः तुझ्यासमोर प्रकट होईन.” दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मोरया गोसावी स्नानासाठी तलावात उतरले आणि बाहेर आले, तेव्हा त्यांच्या हातात भगवान गणेशाची एक लहान, अत्यंत तेजस्वी मूर्ती आपोआप आली. ती मूर्ती साक्षात मोरगावच्या मयुरेश्वराचेच रूप होती. मोरया गोसावी यांनी त्या मूर्तीची स्थापना चिंचवड येथे केली. गणपती बाप्पा मोरया’ जयघोषाची सुरुवात चिंचवडमध्ये मूर्तीची स्थापना झाल्यानंतर दूरदूरवरून भाविक तिच्या दर्शनासाठी येऊ लागले. लोक जेव्हा मोरया गोसावी यांच्या दर्शनाला जात, तेव्हा मोरया गोसावी “गणपती बाप्पा” असा जप करत असत आणि भाविक त्यांच्या सन्मानार्थ “मोरया” असा प्रतिसाद देत असत. हळूहळू देव आणि भक्ताचे नाव एकमेकांत इतके विलीन झाले की, लोक गणपतीचा जप करताना “गणपती बाप्पा मोरया” असा एकत्र जयघोष करू लागले. चिंचवड येथील गणेश मूर्ती आणि मोरगावचा मयुरेश्वर यांच्यात कोणतेही अंतर नाही अशी श्रद्धा विद्यमान आहे. आजही मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी मंदिरातून दरवर्षी पालखी मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराकडे जाते. अशा प्रकारे एका भक्ताच्या निस्सीम भक्तीमुळे देवाच्या नावाआधी भक्ताचे नाव अमर झाले. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!
- पुणे: लाडक्या बाप्पा आणि दुर्गादेवीच्या सन्मानपूर्वक पुनर्विसर्जनासाठी महापालिका घेणार खाण भाडेतत्त्वावर!
महाराष्ट्र
- नाशिक: निवेदनांना केराची टोपली दाखवल्याने संताप! निफाडमध्ये तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने चक्क नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवरच सोडले मोकाट कुत्रे!
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- मुंबई: आता बास झालं, नाहीतर आम्हालाही कायदेशीर पावले उचलावी लागतील; दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा विरोधकांना सज्जड दम!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान


























Subscribe to my channel




