सातारा: चिंचणी, ता. सातारा गावचे सुपुत्र व झाशी येथे ११४ आर्मर्ड इंजिनिअरिंग विभागात नाईक पदावर कार्यरत असलेले जवान रोहित रामचंद्र पवार (वय ३६) यांचे दि. ९ रोजी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (दि. ११) चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मान्यवरांसह उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
जवान रोहित पवार हे २००९ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सध्या त्यांची झाशी येथे पोस्टिंग होती. कर्तव्य बजावत असताना त्यांना दि. ९ रोजी हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. झाशी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव येण्याची प्रतिक्षा ग्रामस्थांना होती. अखेर दि. ११ रोजी पार्थिव चिंचणी येथे आणण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, महेश गाडे, प्रांताधिकारी आशिष बारकुल तसेच माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. रोहित पवार यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
पवार कुटुंब सैन्य दलात
चिंचणी येथील पवार कुटुंबाने देशसेवेला वाहून घेतले आहे. रोहित पवार यांचे वडील रामचंद्र पवार हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या दोन भावांपैकी एक भाऊ सैन्य दलातून निवृत्त झाला आहे, तर दुसरा भाऊ सैन्य दलातून निवृत्तीनंतर पोलिस दलात सेवा बजावत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
- पुणे: पत्नीला प्रसूतीसाठी माहेरी सोडून परतताना काळाचा घाला; मंचर बायपासवर २० फूट खोल खड्ड्यात इको गाडी कोसळून दोघांचा मृत्यू
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- सांगली: थरारक सशस्त्र दरोडा; जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांचा ट्रक अडवून पिस्तुलाच्या धाकाने २५ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लूट
- जालना: विजयी होऊनच परत यायचंय! मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची मुंबई पदयात्रेची घोषणा; २० सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार, अंतरवालीत समर्थकांचा महासागर
- बीड: एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ! बीडमधील आष्टी आगाराच्या विश्रांती कक्षात ४६ वर्षीय एसटी चालकाने संपवले जीवन
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



