कोल्हापुर: माजी सैनिक आणि शेतकऱ्यांचा एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा, शिरोळमध्ये गेट तोडले; थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हल्ल्याचा इशारा

कोल्हापूर: सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिरोळमध्ये पुकारलेल्या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक, महिला आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.

आक्रमक झालेल्या आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात थेट घुसून लोखंडी गेट तोडले आणि इमारतीतील प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. एमआयडीसी रद्द न झाल्यास थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर धडक देण्याचा इशारा देण्यात आला.
सैनिक टाकळी परिसरात होणाऱ्या प्रस्तावित एमआयडीसीमुळे शेतजमिनी, शेती व्यवसाय आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून विरोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आंदोलकांनी शिरोळ प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढला.

 

 

यावेळी घोषणा देत आंदोलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी झाली. आंदोलकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट तोडले. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या काचाही फोडल्या. प्रशासनाने सैनिक टाकळी एमआयडीसीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि ग्रामस्थांच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.


"सैनिक टाकळी येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द करण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. एमआयडीसी रद्द होईपर्यंत माझा लढा सुरूच
राहील. - संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *