पुणे: कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून एका तरुणावर त्याच्या पत्नीच्या भावांनी पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपळे निलख परिसरात घडली. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने झटापटीदरम्यान हल्लेखोराच्या हातातून पिस्तूल खाली पडल्याने तरुण थोडक्यात बचावला, तरीही या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल वीर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल यांच्यासह अनिकेत वीर आणि दीपक वीर हे दोघेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. सध्या या तिघांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रोहन लांडगे आणि संदीप लांडगे या दोन भावांना ताब्यात घेतले आहे. अमोल वीर आणि लांडगे कुटुंबीय हे पूर्वीपासून एकमेकांच्या परिचयाचे असून त्यांचा भागीदारीत हॉटेल व्यवसाय आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी अमोल यांनी लांडगे यांच्या बहिणीसोबत कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा प्रचंड राग रोहन आणि संदीप यांच्या मनात होता.
पिस्तूल खाली पडल्याने टळला मोठा अनर्थ
मंगळवारी दुपारी १ वाजता अमोल वीर हे पिंपळे निलख परिसरात असताना, रोहन आणि संदीप यांनी त्यांना गाठले. पूर्ववैमनस्यातून त्यांनी अमोल यांच्यावर पिस्तूल आणि कोयत्याच्या साहाय्याने थेट हल्ला चढवला. त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल उगारण्यात आले होते, मात्र झालेल्या झटापटीत पिस्तूल हल्लेखोराच्या हातातून जमिनीवर निसटून पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात अमोल यांच्यासह त्यांना वाचवण्यासाठी आलेले अनिकेत आणि दीपक हे दोघेही गंभीर जखमी झाले.
शहर
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
महाराष्ट्र
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल

























Subscribe to my channel



