अमरावती शहरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या रवीनगर चौकात एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीने हत्येनंतर कुटुंबीयांना फोन करून आपण मुलीवर चाकूने वार केल्याची माहिती स्वतः दिल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी वेगाने सूत्रे हलवत आरोपीला गोंदिया रेल्वेस्थानकावरून शिताफीने ताब्यात घेतले आणि अमरावतीत आणले.
नेमकी घटना कशी घडली? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएस्सी प्रथम वर्षाला शिकणारी अल्पवयीन विद्यार्थուी गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास आपली दुचाकी घेऊन महाविद्यालयात जात होती. रवीनगर परिसरातील एका नाल्याजवळ येताच आरोपी आनंद नंदकिशोर भड (वय २२, रा. पोही, ता. मूर्तिजापूर) याने तिला अडवले. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या वादानंतर आरोपीने सोबत आणलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने मुलीवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
हत्येमागचे कारण आणि पोलिसांची कारवाई: पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी आनंद भड आणि मृत अल्पवयीन मुलगी यांची मागील दोन वर्षांपासून ओळख होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून त्या मुलीने आनंदचे फोन उचलणे आणि त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. आपण संपर्क साधत असतानाही ती प्रतिसाद देत नसल्याच्या रागातून आरोपीच्या मनात तिच्याविषयी तीव्र संताप निर्माण झाला होता. याच रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली संशयिताने दिली आहे.
गीतांजली एक्स्प्रेसने केला पसार होण्याचा प्रयत्न: अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर संशयित आनंद भड याने रक्ताच्या थारोळ्यात तिला सोडले आणि तब्बल तासभर आपली दुचाकी घेऊन शहरात विविध भागात फिरत राहिला. त्यानंतर त्याने आपली दुचाकी बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात लावली आणि दुपारी सुटका करून घेण्यासाठी थेट गीतांजली एक्सप्रेस ट्रेन पकडली. तो नागपूर मार्गे गोंदियाच्या दिशेने पसार झाला. राजापेठ पोलिसांचे एक पथक सुरुवातीला त्याच्या शोधासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गावात गेले होते, परंतु तो तिथे सापडला नाही. दरम्यान, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचे मोबाइल लोकेशन ट्रॅक केले असता तो गोंदियात असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ पावले उचलत राजापेठ पोलिसांचे पथक गोंदिया रेल्वेस्थानकावर धडकले आणि गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्याला शिताफीने बेड्या ठोकल्या. उशिरा रात्री त्याला अमरावतीत आणण्यात आले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




