पुण्यात डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर वातावरण तापलेले असतानाच, पुणे पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अत्यंत आक्रमक आणि कठोर पावले उचलली आहेत. लोहियानगर परिसरात पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे अक्षरशः उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी एका सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर आणि साऊंड सिस्टीम मालकावर खडक पोलिसांनी दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणात खडक पोलिसांनी अत्यंत वेगाने पावले उचलत अवघ्या २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, ज्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
लोहियानगरमधील घटना आणि नियमभंग: मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, लोहियानगर कमानीजवळील सार्वजनिक रस्त्यावर 'अल मदिना यंग बॉईज' मंडळाकडून विनापरवाना व प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टीम वाजवण्यात आली. या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने कानठळ्या बसवणारा गोंगाट आणि उपद्रव करण्यात आला. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन साऊंडचा आवाज कमी करण्याबाबत आणि नियम पाळण्याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांना वारंवार सक्त सूचना दिल्या होत्या. मात्र, पोलिसांच्या सूचनेला न जुमानता डीजेचा दणदणाट सुरूच ठेवण्यात आला, ज्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला.
पोलिसांचे लेखी आदेश आणि नोटीसचे उल्लंघन: गणेशोत्सव किंवा इतर मिरवणुकांदरम्यान डीजे साऊंड सिस्टीम, कर्णकर्कश लेझर लाईट आणि फटाक्यांचा अतिवापर करू नये, असे स्पष्ट प्रतिबंधात्मक आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी जारी केले होते. या पोलीस आयुक्तांच्या आदेशाची लेखी माहिती आधीच संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६८ नुसार त्यांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली होती. असे असतानाही न्यायालयाच्या आणि पोलिसांच्या नियमांना धाब्यावर बसवून आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे खडक पोलिसांनी तत्काळ पावले उचलत याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र आणि न्यायालयाचा निकाल: गुन्हा नोंदवून प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेत खडक पोलिसांनी तपासात विलंब न लावता अवघ्या २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर केले. शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रमांक ६ मध्ये या खटल्याची सुनावणी पार पडली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, 'अल मदिना यंग बॉईज' मंडळाचे अध्यक्ष वाहिद कासम मणियार, उपाध्यक्ष जावेद मजीद शेख आणि डीजे साऊंड सिस्टीमचे मालक प्रकाश कृष्णात अस्वले या तिघांना भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ आणि २९२ नुसार दोषी ठरवले आणि त्यानुसार योग्य ती शिक्षा सुनावली.
या कठोर कारवाईमुळे पुण्यात विनापरवाना डीजे वाजवणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे धाबे दणाणले असून, पोलीस प्रशासनाने घेतलेली ही आक्रमक भूमिका शहरभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




