पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपली भक्ती गुपित ठेवा,‎ तिचे जास्त प्रदर्शन करू नका

मोठमोठ्या लोकांचे सुख कधी उडून जाईल आणि कोमेजून जाईल, हे‎सांगता येत नाही. कितीही मोठा सद्गुणी माणूस असला, तरी त्याच्या‎गुणांवर दुर्गुणांचा हल्ला होतोच. तुलसीदासजींनी एका ओळीत याच्या‎रक्षणाचा उपाय सांगितला आहे. तुम्हाला तुमचे सुख आणि गुण टिकवून‎ठेवायचे असतील, तर त्यांना भक्तीशी जोडलेले ठेवा. ते लिहितात-‎‘भगति हीन गुन सब सुख ऐसे, लवन बिना बहु बिंजन जैसे.’‎भक्तीशिवाय सर्व गुण आणि सर्व सुख अगदी तसेच अळणी असतात.‎मीठाशिवाय अनेक प्रकारचे चविष्ट अन्नपदार्थ! जेवणात मीठ व साखर‎दिसत नाहीत, पण खरी चव त्यांच्यामुळेच येते. आपण आयुष्यातील गुण‎व सुखांना भक्तीशी अशाच प्रकारे जोडायला हवे. भक्तीमध्ये प्रदर्शन‎येताच तिचे रूपांतर कर्मकांडात होते. पुढे हे कर्मकांड केवळ सवय बनून‎राहते. म्हणूनच आपली भक्ती नेहमी गुपित ठेवा. तिचे खूप प्रदर्शन करू‎नका. देवाने तुम्हाला गुण आणि सुख दिले असेल, तर त्यातील 10%‎भाग इतरांसाठी खर्च करा. तेव्हा कुठे गुण आणि सुखाला खरी चव‎येईल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *